Diwali Padwa 2023 Messages: दिवाळीच्या पाडव्यानिमित्त खास Image, Wishes, Greetings पाठवून द्या मंगलमय दिवसाच्या शुभेच्छा
बळीला पाताळाचे राज्य देऊन विष्णूने त्याच्या राज्याच्या द्वारपालाचे काम स्वीकारले अशी अख्याईका आहे.
दिवाळीच्या पाच दिवसांच्या उत्सवात कार्तिक शुद्ध प्रतिपदा हा दिवस दिवाळी पाडवा (Diwali Padwa 2023) तसेच बलिप्रतिपदा (Bali Pratipada 2023) नावाने साजरा होतो. यावर्षी हा सण मंगळवारी म्हणजेच 14 नोव्हेंबरला साजरा केला जाणार आहे. साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेला हा दिवस अतिशय शुभ मानला जातो. त्यामुळे या दिवशी आवर्जून सोने, नवीन घर, वाहन यांसारख्या गोष्टींची खरेदी केली जाते. उत्तर भारतात या दिवशी गोवर्धन पूजा केली जाते. याशिवाय महाराष्ट्रात दिवाळी पाडव्याला सुवासिनींकडून पतीचे औक्षण केले जाते. दोघांमधील प्रेम, आपुलकी, जिव्हाळा सतत वाढत राहावा ही यामागील भावना आहे. नवविवाहित जोडप्यांसाठी दिवाळीचा पहिला पाडवा खूप खास असतो.
याच दिवशी बलिप्रतिपदा पूजेला देखील विशेष महत्त्व आहे. मान्यतेनुसार या दिवशी विष्णूने वामन बटूचे रूप घेऊन उदार बळीराजाला जमिनीत म्हणजे पाताळात गाडले. बळीला पाताळाचे राज्य देऊन विष्णूने त्याच्या राज्याच्या द्वारपालाचे काम स्वीकारले अशी अख्याईका आहे. यावेळी भगवानांनी बळीवर प्रसन्न होऊन आशीर्वाद दिला की, प्रतिपदेला तुझी पूजा होईल आणि तो उत्सव म्हणून साजरा केला जाईल. तेव्हापासून बळीची पूजा करण्याची परंपरा सुरू झाली. बळीसारा हा जनतेची काळजी घेत होता म्हणून त्याचे राज्य अजूनही यावे यासाठी ग्रामीण भागात ‘इडा पीडा टळो, बळीचे राज्य येवो’ अशी म्हण रूढ आहे.
तर अशा या मंगलमय दिनी खास SMS, Messages, Greetings, GIFs, Images, WhatsApp Stickers, Wishes शेअर करून द्या दिवाळी पाडव्याच्या शुभेच्छा.
दरम्यान, आर्थिक हिशोबाच्या दृष्टीने व्यापारी लोक दिवाळीतील पाडवा ही नववर्षाची सुरुवात मानतात. यंदा 14 नोव्हेंबर सकाळी 6 वाजून 14 मिनिटे ते सायंकाळी 8 वाजून 35 मिनिटांपर्यंत दिवाळी पाडव्याचा शुभ मुहूर्त आहे. गुजरातमध्ये हा दिवस नवीन वर्षाची सुरुवात समजला जातो आणि नवीन विक्रम संवत वर्ष या दिवसापासून सुरू होते.