COVID-19: कोरोनावर मात केल्याच्या काही महिन्यांनी सुद्धा होऊ शकतो मृत्यू, अध्ययनातून खळबळजनक दावा

त्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे. मात्र ज्या लोकांमध्ये कोरोनाची हलकी लक्षणे आहेत ते होम आयसोलेशनमध्ये राहून बरे होत आहेत.

Coronavirus (Photo Credits-Twitter)

COVID-19:  कोरोनाच्या रुग्णांचा आकडा सध्या दिवसागणिक झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे. मात्र ज्या लोकांमध्ये कोरोनाची हलकी लक्षणे आहेत ते होम आयसोलेशनमध्ये राहून बरे होत आहेत. परंतु काही लोकांमध्ये कोरोनाची लक्षण दीर्घकाळ राहतात आणि अशाच लोकांनी जरी त्यावर मात केली तरीही त्यांचा मृत्यू होण्याचा धोका सर्वाधिक असतो. ही बाब ब्रिटिश पत्रिका 'नेचर' मधील एका अध्ययनात म्हटले आहे. या व्यतिरिक्त CDC द्वारे जाहीर करण्यात आलेल्या आणखी एका अभ्यास या बद्दल सांगण्यात आले आहे. त्यानुसार COVID19 ची हलकी लक्षण दिसून आलेल्या रुग्णालयांमध्ये सुद्धा काही महिन्यांनतर सुद्धा नवी लक्षण दिसून येत आहेत.

नेचर मध्ये छापण्यात आलेल्या या अभ्यासाठी संशोधकांनी डेटाबेस मधून 87 हजारांहून अधिक कोरोना रुग्ण आणि 50 लाख सामान्य रुग्णांची तपासणी केली. त्यांना असे दिसून आले की, कोरोना संक्रमित न झालेल्या रुग्णालयांच्या तुलनेत कोरोनाच्या रुग्णांमध्ये संक्रमणानंतर 6 महिन्यापर्यंत मृत्यूचा धोका 59 टक्क्यांहून अधिक होता.(Plasma Donation: कोरोनावर मात केल्यानंतर किती दिवसानंतर प्लाझ्मा दान करू शकतात? त्यासाठी कोणत्या गोष्टी आवश्यक आहेत? जाणून घ्या सविस्तर)

अध्ययनातून असे ही समोर आले की, 6 महिन्यापर्यंत प्रत्येत 1 हजार मधील 8 रुग्णांचा मृत्यू हा कोरोनाची लक्षणे दीर्घकाळ राहिल्याने झाला आहे. हे मृत्यू कोरोना संबंधित असल्याचे पाहिले जात नाही. संधोककर्त्यांनी असे ही म्हटले, 6 महिन्यात प्रत्येकी 1 हजार रुग्णांपैकी 29 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामध्ये रुग्ण हे 30 दिवसांहून अधिक वेळ रुग्णालयात भरती झालेले होते. हेल्थ एक्सपर्ट यांचे असे म्हणणे आहे, कोरोनामुळे मृत्यू होण्याऱ्यांची बाब आहे त्यावरुन असा निष्कर्ष असा सांगतो की कोरोना झाल्यानंतर होणाऱ्या मृतांचा आकडा हा वरवर आहे. परंतु अभ्यासानुसार ज्या लोकांमध्ये दीर्घकाळापर्यंत लक्षण राहतात त्यांना श्वास घेण्यासह आजारी पडण्याची शक्यता अधिक असते.

रुग्णांना पुढे जाऊन स्ट्रोक, नर्वस सिस्टमचा आजार, तणाव सारखे मानसिक आजार, डायबिटिसची सुरुवात, दृदयासंबंधित आजार,डायरिया, पाचक्रियेत बिघाड, किडनीची समस्या, ब्लड क्लॉट, सांध्यामध्ये दुखणे, केस कळणे आणि थकवा अशा समस्या दिसून येऊ शकतात.

अभ्यासानुसार रुग्णांना एकत्रितपणे यामधील काही समस्यांबद्द तक्रार करु शकतात. ज्या व्यक्तिवर कोविड19 चा परिणाम अधिक होतो त्याला पुढे जाऊन आरोग्य संबंधित समस्या उद्भवण्याची शक्यात जास्त असते.

वॉशिंग्टन युनिव्हर्सिटी मेडिकल स्कूलचे असिस्टंट प्रोफेसर अल अली यांनी म्हटले की, आमच्या अभ्यासातून असे समोर आले संक्रमण झाल्याचे आढळून आल्याच्या 6 महिन्यापर्यंत मृत्यूचा धोका संभवतो. ऐवढेच नाही तर कोविडची हलकी लक्षणे दिसून आलेल्यांमध्ये सुद्धा मृत्यूचा धोका ही कमी नाही आहे. हे संक्रमण गांभीरतासह वाढत जातो. या आजाराचा परिणाम काही वर्षांपर्यंत राहू शकतो.

तर CDC यांनी सुद्धा नुकत्याच कोरोनाची हलकी लक्षणे दिसून आलेल्यांवर अभ्यास केला आहे. त्यांना असे दिसून आले की, दोन तृतीयांश रुग्णांनी 6 महिन्यानंतर कोणत्या ना कोणत्या समस्येसाठी डॉक्टरांना संपर्क केला आहे. हा अभ्यास 3100 हून अधिक लोकांवर करण्यात आला आहे.

त्याचसोबत अभ्यासात असे ही कळले की, संक्रमणाच्या सुरुवातीला कोणीही रुग्णालयात भरती झाले नाही. जवळजवळ 70 टक्के लोकांनी हलक्या संक्रमणातून बरे झाल्यानंतर 1 ते 6 महिन्यांत पुन्हा एकदा डॉक्टरांशी संपर्क साधला आहे. तसेच 40 टक्के लोकांनी तर विशेषज्ञांना संपर्क करावा लागला आहे. अभ्यासाच्या लेखकांचा असे म्हणणे आहे की, डॉक्टरांना माहिती असावे की त्यांच्याकडे येणारे रुग्ण असे ही असू शकतात जे कोरोना झाल्यानंतर ठिक झाले तरीही त्यांच्यामध्ये नवी लक्षणे दिसून आली आहेत.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif