Improve Confidence in Child: मुलांमध्ये 'अश्या' प्रकारे वाढवा आत्मविश्वास; पालकांसाठी काही महत्त्वाचे टीप्स, जाणून घ्या

मुलांमध्ये व्यक्ती विकास वाढावा या करिता आत्मविश्वास वाढणे गरजे असते. मुलांना शिस्तीचे धडे शिकवणे, संस्कार देणे आणि त्यानंतर सर्वात महत्त्वाचे म्हणजे आत्मविश्वास वाढणे हे पालकांचे कर्तव्य असते.

confidence pc tw

Improve Confidence in Child: वाढत्या वयात आपल्या मुलांमध्ये आत्मविश्वास वाढवण्यासाठी पालकांसाठी महत्त्वाची भुमिका असते. मुलांमध्ये व्यक्ती विकास वाढावा या करिता आत्मविश्वास वाढणे गरजे असते. मुलांना शिस्तीचे धडे शिकवणे, संस्कार देणे आणि त्यानंतर सर्वात महत्त्वाचे म्हणजे आत्मविश्वास वाढणे हे पालकांचे कर्तव्य असते. मात्र, खुप प्रयत्न करून ही मुलांमध्ये आत्मविश्वास कमी दिसतो. याचं मुख्य कारण म्हणजे पालक आणि मुलांमधील संवाद. तर जाणून घ्या मुलांमध्ये आत्मविश्वास कसा वाढवावा यासाठी काही टीप्स: (हेही वाचा-  पावसाळ्यात मुले निरोगी राहतील, 'घ्या' अशी काळजी)

१. प्रोत्साहन द्या

आपल्या मुलांमध्ये आत्मविश्वास नसेल तर सर्वप्रथम त्याची कमतरता जाणून घ्या. मुलांना मोकळेपणाने बाहेर खेळण्यास द्या. प्रत्येक लहान मोठ्या यशाचे कौतुक करा. जेणे करू त्यांच्या बालमनावर चांगला परिणाम होईल. प्रत्येक गोष्ट करण्यासाठी प्रयत्न करण्यासाठी प्रेरणा द्या.

२. संवाद साधा

आपल्या मुलांमध्ये आत्मविश्वास वाढवायचा असेल तर पालक आणि मुलांमध्ये नियमित संवाद असायलाच हवा. त्यांचे विचार, भावना, अनुभव शेअर करा. त्यांच्यासमोर कोणतीही नकारात्मक विचार मांडू नका. आपल्या शेजारी असणाऱ्या व्यक्तींशी संवाद साधायला सांगा.

३. त्यांना स्वतंत्र ठेवा

मुलांना त्यांच्या निर्णयांचा आणि कामांचा स्वातंत्र्या द्या. सोबत त्यांना स्वत: वर विश्वास ठेवायला शिकवा. छोट्या मोठ्या कामाची जबाबदारी द्या. नवीन गोष्टी शिकण्यास प्रोत्साहन करा.

४. आव्हाने स्वीकारण्यास प्रोत्साहित करा

मुलांना नवीन अभ्यासाव्यतिरिक्त नवीन गोष्टी शिकण्यास द्या. नवनवीन आव्हाने स्वीकारण्यात प्रोत्साहन करा. यामुळे त्यांना आत्मविश्वास मिळतो. यासाठी आंवतर वाचण करण्यास सांगा.

५. सकारात्मक विचार

मुलांना नेहमी सकारात्मक विचार करायला सांगा. यासाठी पालकांनी देखील त्यांना विचार करण्यासाठी प्रेरित केले पाहिजे. मोकळेपणाने बोलायला शिकवा.

६. चूका सुधारणा

मुलांकडे चुका झाल्यांत त्यांना ओरडून किंवा मारून शिकवण्या ऐवजी त्यांना समजावून सांगा. सर्व प्रथम केलेली चूक स्वीकारायला शिकवा. त्यानंतर पुन्हा चूक होणार नाही याची काळजी घ्या.

७. कौशल्यांचा विकास

मुलांच्या आवडी निवडी लक्षात घेता त्यांच्या कौशल्यांवर लक्ष ठेवा. त्यांना त्यात प्रावीण्य मिळवण्यासाठी प्रोत्साहन करा. टीव्ही आणि मोबाईल यांच्यापासून दूर ठेवा आणि मैदानी खेळ खेळण्यास सांगा.