Zubair Khan Passed Away: काँग्रेस आमदाराचे झुबेर खान यांचे वयाच्या 61 व्या वर्षी निधन; अशोक गेहलोत यांनी व्यक्त केला शोक
जुबेर खान हे अलवर जिल्ह्यातील रामगढ मतदारसंघातून काँग्रेसचे आमदार होते. ते बऱ्याच दिवसांपासून आजारी होते आणि त्यांच्यावर उपचार सुरू होते. आमदार जुबेर खान यांनी आज पहाटे 5.50 वाजता अलवरमध्ये अखेरचा श्वास घेतला.
Zubair Khan Passed Away: राजस्थान (Rajasthan) मधील अलवर जिल्ह्यातील रामगड मतदारसंघातील (Ramgarh Constituency) काँग्रेस आमदार जुबेर खान (Zubair Khan) यांचे शनिवारी सकाळी निधन झाले. अनेक दिवसांपासून आजारी असलेले आमदार जुबेर खान यांनी पहाटे 5.50 वाजता अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने राजस्थान विधानसभेतील काँग्रेस आमदारांची संख्या आता 65 झाली आहे.
प्राप्त माहितीनुसार, जुबेर खान हे अलवर जिल्ह्यातील रामगढ मतदारसंघातून काँग्रेसचे आमदार होते. ते बऱ्याच दिवसांपासून आजारी होते आणि त्यांच्यावर उपचार सुरू होते. आमदार जुबेर खान यांनी आज पहाटे 5.50 वाजता अलवरमध्ये अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या मृत्यूची माहिती त्यांची पत्नी साफिया जुबेर यांनी दिली. साफिया जुबेर या राजकारणातही सक्रिय आहेत. (हेही वाचा - Gujarat Tragedy: गांधीनगर येथील मेश्वो नदीत आठ जणांचा बूडून मृत्यू, पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून शोक)
झुबेर खान यांच्या निधनामुळे काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसला आहे. ते एक अनुभवी आणि समर्पित नेते होते, ज्यांनी अलवर जिल्ह्यात काँग्रेस मजबूत करण्यात भूमिका बजावली. माजी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्यासह अनेक राजकीय नेत्यांनी झुबेर खान यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. झुबेर खान यांना ट्वीट करून श्रद्धांजली वाहताना अशोक गेहलोत म्हणाले की, झुबेर खान यांचे निधन हे पक्षाचे कधीही भरून न येणारे नुकसान आहे. (हेही वाचा - Sitaram Yechury यांचं पार्थिव JNU मध्ये अंत्यदर्शनाला; Kerala CM Pinarayi Vijayan अंतिम दर्शन घेण्यासाठी दिल्लीत दाखल)
झुबेर खान यांच्या निधनावर अशोक गेहलोत यांनी व्यक्त केला शोक -
आमदार जुबेर खान यांच्या निधनाने राजस्थान विधानसभेतील काँग्रेस आमदारांची संख्या 65 झाली आहे. 200 सदस्यांच्या विधानसभेत आता एकूण सात जागा रिक्त आहेत, त्यापैकी लोकसभा निवडणुकीत निवडून आलेल्या आमदारांच्या राजीनाम्यामुळे पाच जागा रिक्त झाल्या आहेत. भाजपच्या एका आमदाराचाही नुकताच मृत्यू झाला. जुबेर खान यांच्या निधनामुळे पक्ष आणि समर्थकांमध्ये शोककळा पसरली आहे.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)