Agra Digital Scammers Case: 'तुमची मुलगी सेक्स रॅकेटमध्ये अडकली...'; डिजिटल स्कॅमर्सच्या फसव्या कॉलने आईचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

मृत महिलेचा मुलगा दीपांशु राजपूत याने सांगितले की, आई मालती वर्मा (वय, 58) या आग्रा येथील अछनेरा येथील एका कनिष्ठ हायस्कूलमध्ये सरकारी शिक्षिका होत्या. 30 सप्टेंबर रोजी दुपारी 12 वाजता तिला व्हॉट्सॲपवर कॉल आला आणि कॉलरने सांगितले की, तिची मुलगी सेक्स स्कँडलमध्ये अडकली आहे.

Digital Scammer, Heart Attack (Photo Crdit - Pixabay)

Agra Digital Scammers Case: सायबर गुन्हेगारांनी (Cyber Criminals) आग्रा (Agra) येथील एका सरकारी शाळेतील शिक्षिकेला (Government School Teacher) फोन करून तिची मुलगी सेक्स स्कँडल (Sex Scandal) मध्ये अडकल्याचे सांगितले. ही बातमी ऐकून शिक्षिकेचा हृदयविकाराच्या झटक्याने (Heart Attack) मृत्यू झाला. याबाबत मृत महिलेच्या कुटुंबीयांनी दावा केला आहे. कुटुंबियांनी सांगितले की, 30 सप्टेंबर रोजी डिजिटल स्कॅमर्सने (Digital Scammers) शिक्षिकेला धमकावले आणि प्रकरण उघड न करण्यासाठी 1 लाख रुपयांची मागणी केली.

मृत महिलेचा मुलगा दीपांशु राजपूत याने सांगितले की, आई मालती वर्मा (वय, 58) या आग्रा येथील अछनेरा येथील एका कनिष्ठ हायस्कूलमध्ये सरकारी शिक्षिका होत्या. 30 सप्टेंबर रोजी दुपारी 12 वाजता तिला व्हॉट्सॲपवर कॉल आला आणि कॉलरने सांगितले की, तिची मुलगी सेक्स स्कँडलमध्ये अडकली आहे. स्कॅमर्सने खंडणी न दिल्यास तिच्या मुलीची ओळख उघड करण्याची धमकी दिली. (हेही वाचा - Nagpur Cyber Crime: नागपूरमध्ये सायबर पोलीस असल्याचे भासवून बनावट ईमेलद्वारे राष्ट्रीयीकृत बँकांची फसवणूक, दोघांना अटक)

सायबर गुन्हेगारांकडून फसवे कॉल -

राजपूत यांनी सांगितले की, फोन करणाऱ्याने स्वत:ची ओळख पोलीस निरीक्षक अशी केली. यानंतर आईने माझ्याशी फोनवर बोलून मला फोनबद्दल सांगितले. पण फोन नंबर तपासल्यावर मी माझ्या आईला सांगितले की हा सायबर गुन्हेगारांनी केलेला फसवा कॉल होता. यानंतर मी माझ्या बहिणीशीही बोललो. त्यानंतर मला सर्व काही सामान्य आढळले. मी माझ्या आईला सायबर फसवणुकीचा बळी असल्याने काळजी करू नका, असे सांगितले, परंतु त्या कॉलनंतर ती तिच्या तणावावर नियंत्रण ठेवू शकली नाही आणि तिची प्रकृती खालावली. (हेही वाचा - Cyber Crime: मुंबई पोलिसांची मोठी कारवाई! सायबर घोटाळेबाजांकडून वसूल केली 100 कोटी रुपयांची फसवणूक केलेली रक्कम; 35,918 तक्रारींचे केले निवारण)

दरम्यान, जेव्हा ती शाळेतून घरी परतली तेव्हा तिने छातीत दुखत असून अस्वस्थतेची तक्रार केली. तिची प्रकृती ढासळू लागल्यावर आम्ही तिला रुग्णालयात नेले. तेथे डॉक्टरांनी तिला हृदयविकाराच्या झटक्याने मृत घोषित केले. जगदीशपुरा पोलिस स्टेशनचे प्रभारी आनंदवीर सिंह यांनी सांगितले की, आम्हाला या प्रकरणी कुटुंबाकडून तक्रार मिळाली आहे. त्यानुसार कारवाई केली जाईल.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now