Yes Bank Case: येस बँक घोटाळा प्रकरणातील मुख्य आरोपी राणा कपूर यांचा लंडनमधील 127 कोटी रुपयांचा फ्लॅट 'ईडी'कडून जप्त
राणा कपूर यांना मार्च महिन्यात प्रिव्हेन्शन ऑफ मनी लाँड्रिंग अॅक्ट अंतर्गत ईडीने अटक केली होती. ईडीकडून जप्त करण्यात आलेल्या राणा यांच्या लंडनमधील अलिशान प्लॅटची किंमत 13.5 मिलियन पाऊड म्हणजेचं 127 कोटी इतकी आहे. राणा कपूर यांनी 2017 मध्ये 93 कोटी रुपयांना ही अपार्टमेंट खरेदी केली होती. यापूर्वी ईडीने राणा कपूर यांच्या वरळी येथील घरावर छापे मारले होते. कपूर यांच्यावर डीएचएलएफ (DHFL)ला कर्ज दिल्या प्रकरणी ही कारवाई करण्यात आली होती. येस बँकेने DHFL ला सुमारे 3600 कोटींचे कर्ज दिले होते.
Yes Bank Case: येस बँक घोटाळा प्रकरणी बँकेचे माजी व्यवस्थापकीय संचालक राणा कपूर (Rana Kapoor’s) यांच्या मालकीचा लंडनमधील 127 कोटी रुपयांचा फ्लॅट सक्तवसुली संचनालयाने (Enforcement Directorate) जप्त केला आहे. राणा कपूर यांना मार्च महिन्यात प्रिव्हेन्शन ऑफ मनी लाँड्रिंग अॅक्ट अंतर्गत ईडीने अटक केली होती. ईडीकडून जप्त करण्यात आलेल्या राणा यांच्या लंडनमधील अलिशान प्लॅटची किंमत 13.5 मिलियन पाऊड म्हणजेचं 127 कोटी इतकी आहे. राणा कपूर यांनी 2017 मध्ये 93 कोटी रुपयांना ही अपार्टमेंट खरेदी केली होती. यापूर्वी ईडीने राणा कपूर यांच्या वरळी येथील घरावर छापे मारले होते. कपूर यांच्यावर डीएचएलएफ (DHFL)ला कर्ज दिल्या प्रकरणी ही कारवाई करण्यात आली होती. येस बँकेने DHFL ला सुमारे 3600 कोटींचे कर्ज दिले होते.
केंद्रीय अन्वेषण ब्युरोने (सीबीआय) मार्चमध्ये कपूर यांच्याविरोधात भ्रष्टाचाराची दोन प्रकरणे दाखल केल्यानंतर ईडीने मनी लॉन्ड्रिंगच्या आरोपाखाली त्यांची चौकशी सुरू केली होती. सीबीआयने आरोप केला आहे की, डीएचएफएलने अर्बन व्हेंचर्स (इंडिया) प्रायव्हेट लिमिटेडला कर्ज मंजूर केले आहे. या कंपनीच्या संचालक कपूरची पत्नी बिंदू या आहेत. या कंपनीच्या त्या 100% भागधारक आहेत. याशिवाय कपूर यांच्या मुली राखी कपूर टंडन, रोशनी कपूर आणि राधा कपूर DoIT Urban Ventures मध्ये 100% भागधारक आहेत. (हेही वाचा - YES Bank Case: अनिल अंबानी यांच्या समोरील अडचणी वाढल्या; ED कडून समन्स जारी)
दरम्यान, सीबीआयने येस बँक आणि डीएचएलएफ प्रकरणात आरोपपत्र दाखल केले आहे. येस बँकेने दिलेले कर्ज डीएचएफएलने बुडवले. त्यामुळे राणा कपूर, त्यांची पत्नी आणि दोन्ही मुली व डीएचएफएलचे प्रवर्तक बंधू कपिल वाधवान व धीरज वाधवान यांच्याविरुद्ध आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी राणा कपूर आणि वाधवान बंधू यांना सीबीआय कोठडी सुनावण्यात आली होती. सध्या हे तीघेही तळोजाच्या कारागृहात आहे.
राणा कपूर यांनी 1980 साली बँक ऑफ अमेरिकेत मॅनेजमेंट ट्रेनी म्हणून कामाला सुरुवात केली. त्यांनी बँक ऑफ अमेरिकेसोबत तब्बल 16 वर्ष काम केलं. त्यानंतर 2004 साली राणा कपूर यांनी नातेवाईक अशोक कपूर यांच्या सोबत येस बँकेची स्थापना केली. मात्र, 26/11 च्या हल्ल्यात बँकेचे सहसंस्थापक अशोक कपूर यांचा मृत्यू झाला. त्यानंतरच्या काळात अशोक कपूर यांच्या पत्नी आणि राणा कपूर यांच्यात बँकेच्या भागीदारीवरुन वादाला सुरुवात झाली. राणा यांनी वैयक्तिक संबंधानुसार येस बँकेतून कर्ज देण्यास सुरुवात केली.