World's Most Polluted Cities: जगातील सर्वाधिक प्रदूषित 20 शहरांपैकी 15 शहरे आहेत भारतातील, 'ही' यादी पाहुन तुम्ही व्हाल थक्क

गेल्या वर्षीच्या म्हणजेच 2022 च्या तुलनेत, खराब हवेची गुणवत्ता असलेल्या देशांच्या यादीत (World's Most Polluted Cities) भारताने तीन स्थानांवर सुधारणा केली आहे. या अहवालानुसार चाड, इराक, पाकिस्तान, बहरीन आणि बांगलादेश हे जगातील सर्वाधिक प्रदूषित देश आहेत.

Delhi Pollution (PC - PTI)

भारतात सातत्याने प्रदूषण वाढत आहे. परिस्थिती इतकी बिकट झाली आहे की जगातील सर्वाधिक प्रदूषित 20 शहरांपैकी 15 शहरे भारतातील आहेत. तथापि, गेल्या वर्षीच्या म्हणजेच 2022 च्या तुलनेत, खराब हवेची गुणवत्ता असलेल्या देशांच्या यादीत (World's Most Polluted Cities) भारताने तीन स्थानांवर सुधारणा केली आहे. या अहवालानुसार चाड, इराक, पाकिस्तान, बहरीन आणि बांगलादेश हे जगातील सर्वाधिक प्रदूषित देश आहेत. या यादीत भारत आठव्या क्रमांकावर आहे. नियामधील सर्वात प्रदूषित शहर पाकिस्तानातील लाहोर आहे. यानंतर चीनचे होटन दुसऱ्या स्थानावर आहे, तर भारताचे भिवंडी शहर तिसऱ्या स्थानावर आहे. दिल्ली चौथ्या क्रमांकावर आहे.

येथे पहा संपूर्ण यादी

      • लाहोर, पाकिस्तान
      • होटन, चीन
      • भिवंडी, भारत
      • दिल्ली, भारत
      • पेशावर, पाकिस्तान
      • दरभंगा, भारत
      • आसोपूर, भारत
      • नदजामेना, चाड
      • नवी दिल्ली, भारत
      • पाटणा, भारत
      • गाझियाबाद, भारत
      • धरुहेरा, भारत
      • बगदाद, इराक
      • छप्रा, भारत
      • मुझफ्फरनगर, भारत
      • फैसलाबाद, भारत
      • ग्रेटर नोएडा, भारत
      • बहादूरगड, भारत
      • फरीदाबाद, भारत
      • मुझफ्फरपूर, भारत

    दिल्ली हे चौथ्या क्रमांकाचे प्रदूषित शहर आणि जागतिक स्तरावर दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात प्रदूषित राजधानीचे शहर आहे. सर्वात प्रदूषित राजधानीचे शहर नदजामेना (चाड) आहे. (हे देखील वाचा: Housing Sales in India: आर्थिक वर्षे 2023 मध्ये देशात तब्बल 3.47 ट्रिलियन रुपयांच्या घरांची विक्री; मुंबई आणि पुणे आघाडीवर- Anarock)

वाढते प्रदूषण  आहे मोठे आव्हान

गेल्या काही वर्षांत आपल्या वातावरणात ज्या प्रकारे प्रदूषण वाढत आहे, ते केवळ वर्तमानासाठीच नव्हे तर भविष्यासाठीही अनेक प्रकारे आव्हानात्मक ठरू शकते. भारताची राजधानी दिल्ली हे त्याचे उत्तम उदाहरण आहे. दिवाळीनंतर दिल्ली-एनसीआरमध्ये प्रदूषण इतके वाढते की लोकांना मोकळ्या हवेत श्वास घेणेही कठीण होते.

केंद्र तसेच राज्य सरकारने आखले पाहिजे महत्त्वाचे धोरण

जलप्रदूषण ही देखील आपल्यासाठी गंभीर समस्या आहे. दिल्लीतील यमुनेची स्थिती सर्वांनाच माहिती आहे. येणाऱ्या काळात शुद्ध पाण्यासाठी किती संघर्ष करावा लागेल याची साक्ष यमुनेचा फेस देतो. प्रदूषणाचा मुकाबला करण्यासाठी केंद्र तसेच राज्य सरकारने महत्त्वाचे धोरण आखले पाहिजे. यासोबतच प्रत्येक व्यक्तीने जबाबदार नागरिक बनून योगदान दिले पाहिजे, तरच प्रदूषणाच्या लढाईत विजय शक्य आहे.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now