Uttar Pradesh: प्रदेशच्या बुलंदशहरमध्ये एका महिला पोलीस उपनिरीक्षकाची गळफास लावून आत्महत्या; सुसाईड नोटमध्ये लिहले मृत्यूचे कारण

पोलिसांनी महिला उपनिरीक्षकांचा मृतहेद ताब्यात घेतला असून शवविच्छेदनासाठी जवळच्या रुग्णालयात पाठवला आहे.

Representational Image (Photo Credits: Facebook)

एका पोलीस महिला पोलीस कर्मचाऱ्याने गळफास लावून आत्महत्या (Woman Sub-Inspector Suicide) केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ही घटना उत्तर प्रदेशच्या (Uttar Pradesh) बुलंदशहरमध्ये (Bulandshahr) घडली आहे. पोलिसांनी महिला उपनिरीक्षकांचा मृतहेद ताब्यात घेतला असून शवविच्छेदनासाठी जवळच्या रुग्णालयात पाठवला आहे. स्थानिक पोलिसांना त्यांच्या मृतदेहाजवळ एक सुसाईड नोट सापडली आहे. ज्यात त्यांनी हे माझ्या कर्माचे फळ आहेत. यासाठी कोणालाही जबाबदार धरू नये, असे लिहले आहे. तसेच याप्रकरणी पोलिसांनी अधिक चौकशीला सुरुवात केली आहे.

आरजू पवार असे आत्महत्या केलेल्या महिला पोलीस उपनिरीक्षकांचे नाव होते. आरजू पवार या 2015 बॅचच्या एसआय आहेत. त्या शामली येथे एका भाड्याच्या खोलीत राहत होत्या. दरम्यान, सातच्या सुमारास आरजू या जेवण काय आहे? अशी विचारणा करून गेल्या. मात्र, त्या पुन्हा परतल्याच नाही. यामुळे घरमालक त्यांना आवाज देण्यासाठी गेला. त्यावेळी आरजू यांनी पंख्याला गळफास घेतलेल्या अवस्थेत घरमालकाला आढळून आले. या संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू असून आत्महत्येचे नेमके कारण अद्याप समोर आले नाही. दरम्यान, शवविच्छेदनाचा अहवाल आल्यानंतर तपासाची दिशा ठरवली जाईल, अशी माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे. टाईम्स ऑफ इंडियाने यासंदर्भात वृत्त दिले आहे. हे देखील वाचा- मी माझं जीवन संपवत आहे, जेणेकरून काहीतरी तोडगा निघू शकेल; गाझीपूर बॉर्डरवर आंदोलनात सहभागी झालेल्या शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या

याआधी महाराष्ट्रातील नालासोपाऱ्याच्या तुळींज पोलीस ठाण्यातील एका पोलीस कर्मचाऱ्याने पोलीस निरीक्षकांच्या दालनातच स्वतःला बंदुकीने गोळ्या झाडून आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आली होती. सखाराम भोये असे या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव असून ते हवालदार पदावर कार्यरत होते. या घटनेनंतर नालासोपारा परिसरात एकच खळबळ माजली होती.