Wife's Nude Pictures: केरळच्या त्रिशूरमध्ये पतीने हुंड्यासाठी पत्नीचे नग्न छायाचित्रे इंटरनेटवर केले पोस्ट, पोलिसांनी केली कारवाई

केरळमधील त्रिशूर जिल्ह्यात एका तरुणाने पत्नीचे नग्न छायाचित्र सोशल मीडियावर पोस्ट केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी समोर आली आहे. याप्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे, जाणून घ्या अधिक माहिती

Wife's Nude Pictures: केरळच्या त्रिशूरमध्ये पतीने हुंड्यासाठी पत्नीचे नग्न छायाचित्रे इंटरनेटवर केले पोस्ट, पोलिसांनी केली कारवाई
Image Used For Representational purpose Only | Photo Credits: Pixabay.com

Wife's Nude Pictures: केरळमधील त्रिशूर जिल्ह्यात एका तरुणाने पत्नीचे नग्न छायाचित्र सोशल मीडियावर पोस्ट केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी समोर आली आहे. याप्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे. सेबी (३३) असे आरोपीचे नाव असून तो मूळचा त्रिशूर जिल्ह्यातील एरुमापेट्टी भागातील रहिवासी आहे. एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, सेबीला त्याच्या पत्नीने त्याच्याविरुद्ध दाखल केलेल्या तक्रारीनंतर अटक करण्यात आले आहे. राज्यातील पलक्कड जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या महिलेशी सेबीने अडीच वर्षांपूर्वी लग्न केल्याचे कळते. महिलेने सांगितले की, लग्नाच्या वेळी तिच्या कुटुंबीयांनी पतीला हुंडा म्हणून 80 ग्रॅम सोने दिले होते. मात्र लग्नानंतर तो आणखी हुंडा मागत होता, असे महिलेने तक्रारीत म्हटले आहे. पोलिसांचे म्हणणे आहे की, त्याच्या पत्नीच्या तक्रारीनुसार, सेबी त्याच्या पत्नीला हुंड्याच्या मागणीसाठी सतत त्रास देत होता.

सेबी व्यतिरिक्त त्याच्या कुटुंबीयांनीही हुंड्यासाठी तरुणीवर मानसिक आणि शारीरिक अत्याचार केले, असे महिलेने सांगितले. मात्र, यापैकी कोणतीही बाब आर्थिकदृष्ट्या दुर्बल तरुणीच्या पालकांना कळवण्यात आली नाही. सेबी आणि त्याच्या पालकांविरुद्ध हुंड्यासाठी छळ केल्याप्रकरणी तपास सुरू असताना, सेबीच्या पत्नीने तिच्या पतीवर तिचे नग्न छायाचित्र सोशल मीडियावर प्रसारित केल्याचा आरोप केला. हुंड्यासाठी तिचा छळ होत असताना अश्‍लील छायाचित्रे शेअर करणाऱ्या अॅपवर नग्न छायाचित्रे प्रसारित करण्यात आली होती, असे तिने सांगितले.

सेबीच्या पत्नीने कुन्नमकुलम पोलिसांत तक्रार दाखल केली. तक्रारीच्या आधारे पोलिसांनी सेबीचा मोबाईल फोन तपासणीसाठी जप्त केला. एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, त्यानंतरच्या तपासात असे दिसून आले की सेबीने खरोखरच त्यांच्या पत्नीचे फोटो ऑनलाइन अॅपवर शेअर केले आहेत. पोलिसांनी या प्रकरणाचा अधिक  तपास करत आहे. तपास पूर्ण करण्यासाठी पोलिसांचे विशेष पथक तयार करण्यात आले आहे. 

(The above story first appeared on LatestLY on May 17, 2023 01:02 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).