पती करत नाही महत्त्वाचे काम, पत्नीने मागितला घटस्फोट; कारण जाणून बसेल धक्का
(संग्रहित, संपादित आणि प्रतिकात्मक प्रतिमा)

पती पत्नीमध्ये अनेक कारणांवरून घटस्फोट होतो. परंतु, पाटणामधील (Patna) घटस्फोटाचे कारण ऐकून सर्वांनाच धक्का लागला आहे. आपला पती नेहमीतपणे दात घासत नाही. तसेच दररोज अंघोळ करण्याऐवजी 10 दिवसानंतर अंघोळ करतो. आपल्या पतीची अनेकदा समजूत घातली तरी देखील त्याच्यात काहीच फरक पडला नाही. याला वैतागून पत्नीने घटस्फोट (Divorce) घेण्याचा निर्णय घेतला आहे. संबंधित महिलेने घटस्फोटासाठी अर्ज केला आहे. एवढेच नव्हे तर, महिला आयोगानेही या तक्रारीची दखल घेतली आहे. महिला आयोगातील समुपदेशकांनी या दोघांना घटस्फोटाचा टोकाचा निर्णय न घेण्याचा सल्ला दिला आहे.

सोनी देवी असे तक्रारदार महिलेचे नाव असून मनीष राम यांच्यासोबत असे तिच्या पतीचे नाव आहे. सोनी आणि मनीष यांचे २०१७ मध्ये विवाह झाले होते. आपल्या आईवडीलांनी आपले लग्न मनीष याच्याशी लावून दिले असून पतीसंदर्भात आपल्याला काहीच माहिती नव्हती, असे पत्नी सोनी म्हणाली आहे. तसेच आपला पती मनीष दररोज दात घासत नाही. याशिवाय तो दररोज अंघोळ करण्याऐवजी तब्बल 10 दिवसांनी अंघोळ करतो. मनीषने स्वच्छ राहावे यासाठी सोनीने अनेकदा त्याची समजूत घातली. परंतु, मनीष याच्यात काहीच बदल न झाल्याने वैतागून सोनीने घटस्फोटाचा अर्ज दिला असल्याचे तिने सांगितले. हे देखील वाचा- बायकोला दाखवला पॉर्न; पहिल्याच रात्री नवऱ्याची रवानगी पोलीस ठाण्यात; गुजरात राज्यातील मोठ्या शहरातील घटना

पती-पत्नीत भांडणे, वाद-विवाद, सतत उडणारे खटके अशी अनेक कारणे असतात. मात्र, पाटणामध्ये घटस्फोटासाठी अजबच कारण समोर आले आहे. महिला आयोगानेही या तक्रारीचे दखल घेतली असून मनीषने नियमित आंघोळ करावी आणि दात घासावेत असे सांगितले आहे.