Rajastan Accident: अंतिम संस्कार करून घरी परतत असताना रस्त्यात मृत्यूने गाठले, ट्रक आणि कारचा अपघात, एकाच कुटुंबातील चार ठार

या अपघातात एकाच कुटुंबातील चार जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये ६५ वर्षीय वृध्द महिलेचा समावेश होता.

Accident | (Photo credit: archived, edited, representative image)

Rajastan Accident: राजस्थानमध्ये एक भीषण अपघात झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या अपघातात एकाच कुटुंबातील चार जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये 65 वर्षीय वृध्द महिलेचा समावेश होता. ही घटना रविवारी सकाळी घडली. ही घटना सवाई माधोपूर येथे दिल्ली मुंबई द्रुतगती मार्गावर घडली. कारची आणि ट्रक एकमेकांना धडक लागल्याने हा अपघात घडला. हेही वाचा- अनियंत्रित ट्रक झोपडीवर पलटला, एकाचा मृत्यू, तीन जखमी

मिळालेल्या माहितीनुसार, हे कुटुंब एका सदस्याचे अंतिम संस्कार करून हरिद्वारहून घरी परतत होते. त्यावेळी हा अपघात घडला.  हा अपघात इतका भीषण होता की, कारचा अक्षरश: चुराडा झाला. कार रस्त्यावरून क्रेनच्या सहाय्याने हटवण्यात आली. या अपघातानंतर ट्रक चालक घटनास्थळावरून फरार झाला. राजेंद्र प्रजापत (22), मोनिक प्रजापत (24), रेखा प्रजापत(42), धापू देवी प्रजापत (65) अशी मृतांची नावे आहेत.

या अपघातात आणखी पाच जण जखमी झाले आहे. पायल, कृष्णाबाई, बुलबुल, ज्योती, अनिता आणि शकील खान अशी जखमींची नावे आहेत. यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहे. पोलिसांनी माध्यमांना सांगितले की, हा अपघात ट्रक चालकाच्या निष्काळजीपणामुळे झाला आहे. ट्रक चालक फरार झाला आहे. ट्रक पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी पुढील तपासणी सुरु केली आहे. या घटनेची नोंद पोलिसांनी घेतली आहे.