IPL Auction 2025 Live

Rule Change From July 2023: जुलै महिन्यात कोणत्या नियमांत होणार बदल? जाणून घ्या खिश्याला फटका की बचत ?

तुलै महिन्यात एलपीजी सिलेंडर, व्यावसायिक सिलेंडर, सीएनजी-पीएनजीसह अनेक वस्तूंच्या किमती आणि नियमांमध्ये बदल होणार आहे.

rule chanhe from jule (file)

Rule Change From July 2023: जून महिना संपायला अवघे काही तासच उरले आहेत. तर ह्या येणाऱ्या महिन्यात काय बदल होणार आहे तर चला पाहूयात. सरकार दरमहिन्यात काही वस्तूची किंमत वाढते तर काही गोष्टीच्या नियमांत बदल होतो. जुलै महिन्यात एलपीजी सिलेंडर, व्यवसायिक सिलेंडर, सीएनजी-पीएनजीसह अनेक वस्तूंच्या किंमतीत आणि नियमांमध्ये बदल होणार आहे.

दरमहिन्यांत सरकार सिंलेडरच्या किंमतीत बदल करून आणणे अपेक्षितच आहे आणि प्रत्येक महिन्याच्या पहिल्या तारखेला सिलेंडरच्या किंमती घोषित करतो. मे आणि एप्रिलमध्ये 19 किलोच्या व्यावसायिक वापराच्या गॅस सिलेंडरच्या किमतींत कपात करण्यात आली होती, मात्र 14 किलो गॅस सिलेंडरच्या दरांत कोणताही बदल करण्यात आला नव्हता.  १ जूनला एलपीजी सिलेंडर स्वस्त झाला होता.  यंदा घरगुतील एलपीजी सिलेंडरच्या किमती कमी होण्याची शक्यता असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.

परदेशात क्रेडिट कार्डवर नियम

परदेशात जर क्रेडिट कार्डवर 7 लाखांपेक्षा जास्त खर्च करत असाल, तर 20 टक्क्यांपर्यंत TDS कापला जाईल. परंतू शैक्षणिक आणि वैद्यकिय वापरासाठी 5 टक्क्यांपर्यंत TDS कमी केला जाईल. शिक्षणासाठी कर्ज घेत असाल तर आणखी कमी करून  0.5 टक्के इतका केला जाईल.

सीएनजी आणि पीएनजीत काय होणार बदल

दरमहिन्यात सीएनजी आणि पीएनजी मध्ये बदल होतात. तर ह्या महिन्यात देखील बदल होण्याची शक्यता वर्तवली आहे.

ITR संदर्भात मोठा नियम

३१ जुलैपर्यंत तुम्ही ITR भरू शकता.जर अद्यापही इन्कम टॅक्स रिटर्न भरला नसेल तर लवकरात लवकर भरून टाका.