Ethanol Vehicle In India: इथेनॉलवर चालणारी पहिली कार कधी येणार? नितीन गडकरींनी दिलं मोठ अपडेट
बजाज, TVS आणि Hero या कंपन्यांनी 100 टक्के इथेनॉलवर चालणाऱ्या मोटारसायकल बनवल्या आहेत.
Ethanol Vehicle In India: केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी 100 टक्के इथेनॉलवर चालणारी नवीन वाहने (Ethanol Vehicle) ऑगस्टमध्ये सुरू करण्यात येणार असल्याची घोषणा केली आहे. या माध्यमातून पेट्रोल-डिझेलवरील (Petrol Diesel Ethanol)अवलंबित्वही संपुष्टात येईल, असंही त्यांनी म्हटलं आहे. नितीन गडकरी यांनीही हायड्रोजनवर चालणाऱ्या कार लॉन्च करण्याबाबत महत्त्वपूर्ण वक्तव्य केलं आहे. या नव्या तंत्रज्ञानाचा देशातील शेतकऱ्यांनाही मोठा फायदा होणार असल्याचे त्यांनी गडकरी यांनी सांगितलं आहे.
इथेनॉलवर चालणाऱ्या वाहनांबाबत बोलताना नितीन गडकरी म्हणाले, ऑगस्टपासून मी इथेनॉलवर 100 टक्के चालणारी वाहने बाजारात आणणार आहे. बजाज, TVS आणि Hero या कंपन्यांनी 100 टक्के इथेनॉलवर चालणाऱ्या मोटारसायकल बनवल्या आहेत. या सर्व लवकरच सुरू केल्या जातील. (हेही वाचा -EAM S Jaishankar's Sharp Attack On Canada: परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांचा कॅनडावर तीव्र हल्ला; म्हणाले- 'खलिस्तानी मुद्द्यावर त्यांच्या प्रतिक्रिया या व्होटबँकेच्या राजकारणाने चालतात' (Watch))
सध्या 60 टक्के पेट्रोल आणि 40 टक्के इलेक्ट्रिक मिडीयमवर चालणारी टोयोटाची केमरी कार लवकरच 60 टक्के इथेनॉल आणि 40 टक्के विजेवर चालणारी वाहने बाजारात आणणार असल्याचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले. (वाचा - Rahul Gandhi visit Manipur: राहुल गांधी हिंसाचारग्रस्त मणिपूर दौऱ्यावर; इम्फाळ आणि चुरचंदपूर येथील नागरिकांशी साधणार संवाद)
देशाच्या वाहतूक क्षेत्रात इथेनॉल ही नवी क्रांती असल्याचे सांगताना नितीन गडकरी म्हणाले की, ते स्वदेशी आणि प्रदूषणमुक्त इंधन असेल. हे शेतकऱ्यांच्या आर्थिक फायद्याचे असणार आहे. उसाच्या रसापासून इथेनॉल तयार करण्यात येणार असून याचा मोठा फायदा शेतकऱ्यांना होणार आहे.