Weather Update: 'या' राज्यांमध्ये पावसाची हजेरी, उत्तर भारतात थंडीची लाट; वाचा हवामान विभागाचा अंदाज
दरम्यान पुढील ४८ तासांत ठिकठिकाणी रिमझिम पाऊस पाहायला मिळणार आहे.
Weather Update: देशात दिवसेंदिवस थंडीत वाढ होताना दिसत आहे. दरम्यान पुढील 48 तासांत ठिकठिकाणी रिमझिम पाऊस पाहायला मिळणार आहे. पावसामुळे शेतकरी संकटात सापडणार आहे. मिचॉन्ग चक्रीवादळाचा प्रभाव कमी झाला असला तरी पुढील दोन दिवस महाराष्ट्रात पाऊस असणार आहे अशा अंदाज हवामान खात्याकडून आला आहे. देशातील काही ठिकाणी पावसाची एन्ट्री होणार आहे. उत्तर भारतात थंडी वाढताना दिसत आहे. तर दक्षिण भारतात रिमझिम पावसाची शक्यता होणार आहे. (हेही वाचा-आजही मराठवाडा, विदर्भासह राज्यातील अनेक भागांमध्ये कडाक्याची थंडी
महाराष्ट्र राज्यात काही भागात थंडी कायम राहणार आहे. तर कोकणात हलक्या स्वरूपाचा पाऊस असणार आहे. विदर्भात थंडीचा जोर वाढला असून पाऊस पडणार असल्याचे आयएमडीने इशारा दिला आहे. उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांचा वेग कमी झाल्यामुळे तापमानात थोडी वाढ होणार आहे. दक्षिणेकडून किंवा आग्नेयकडून येणाऱ्या वाऱ्यात बाष्प जास्त असल्याने आजही दक्षिण कोकण, दक्षिण महाराष्ट्र आणि मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी हवामान ढगाळ राहणार आहे.
आज पासून पुढील दोन दिवस दक्षिण भारतात पाऊस असणार आहे. तामिळनाडू, केरळ आणि लक्षद्वीप या ठिकाणी रिमझिम पावसाची शक्यता आहे. उत्तर भारतात थंडीचा कडाका वाढला आहे. जम्मू काश्मीर, उत्तराखंड तसेच हिमालयात काही ठिकाणी बर्फवृष्टी होणार आहे. देशातील ओडिसा, पश्चिम बंगाल या भागात धुक्याची चादर पाहायला मिळणार आहे. दरम्यान तापमानातही घट झाल्याचं पाहायला मिळेल.