Rahul Gandhi and Sonia Gandhi: 'अमेठी, रायबरेलीतून साद आल्यास आम्ही तिथे हजर राहू'; राहुल गांधीकडून सोनिया गांधींसोबत भावनिक व्हिडीओ शेअर(Watch Video)
ज्या द्वारे रायबरेली आणि अमेठी सोबतचे त्याचे नाते किती भावनिक असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
Rahul Gandhi and Sonia Gandhi : काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi)यांनी आज मंगळवारी एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये ते सोनिया गांधी(Sonia Gandhi)यांच्या सोबत जुने कौटुंबिक फोटो पाहताना दिसत आहेत. रायबरेली(Raebareli)आणि अमेठी(Amethi)सोबत कौटुंबिक नाते असल्याचे त्यांनी म्हटले आहे. रायबरेली मतदार संघातून राहुल गांधी लोकसभेच्या रिंगणात उतरले आहेत. तिथे त्यांची लढत स्मृती इराणी यांच्यासोबत होत आहे. २०१९ मध्ये स्मृती इराणी अमेठीतून जिंकल्या होत्या. (हेही वाचा:Rahul Gandhi YouTube Channel: यूट्यूबवर काँग्रेस नेते राहुल गांधींची बाजी, पंतप्रधान मोदी चौथ्या क्रमांकावर )
एक्सवर राहूल गांधी यांनी व्हिडीओ शेअर करताना "रायबरेली आणि अमेठी हे आमच्यासाठी फक्त निवडणूक मतदारसंघ नाहीत तर ते आमची कर्मभूमि आहे. ज्याचा प्रत्येक कोपरा पिढ्यान्पिढ्यांची आठवणी देतो. आईसोबतची जुने फोटो पाहून मला माझे वडीलांची आणि आजीची आठवण आली. ज्यांच्या सेवेची परंपरा माझ्या आईने सुरू केली आणि मी पुढे सुरू राहिली. प्रेम आणि विश्वासाच्या पायावर बांधलेल्या या 100 वर्षांहून अधिक जुन्या नात्याने आपल्याला सर्व काही दिले आहे. त्यामुळे जेव्हा जेव्हा अमेठी आणि रायबरेली आम्हाला बोलावतात तेव्हा आम्ही तिथे भेटू" असे लिहित म्हटले आहे.
जुने फोटो पाहत असताना, राहूल गांधी यांनी त्यांचे वडील तसेच माजी पंतप्रधान राजीव गांधी आणि आजी इंदिरा गांधी यांचीही आठवण काढी. इंदिरा गांधी या देशाच्या पहिल्या आणि आजपर्यंतच्या एकमेव महिला पंतप्रधान होत्या.