Delhi Election 2020: दिल्ली विधानसभेच्या 70 जागांसाठी आज मतदान; आम आदमी पार्टी, काँग्रेस आणि भाजपा पक्षाची प्रतिष्ठा पणाला

या निवडणुकीत आम आदमी पार्टी, काँग्रेस आणि भाजप पक्षाची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. आज दिल्ली विधानसभेच्या रिंगणात उतरलेल्या 672 उमेदवारांचे भवितव्य ठरणार आहे. दिल्लीतील एक कोटी पेक्षा जास्त नोंदणीकृत मतदार आहेत. आज हे सर्व मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. मतदानादरम्यान, कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी दिल्लीत पोलिस बंदोबस्त करण्यात आला आहे.

Delhi Assembly Elections 2020 (Photo Credits: ANI)

Delhi Election 2020: दिल्ली विधानसभेच्या 70 जागांसाठी आज मतदानाला सुरुवात झाली आहे. या निवडणुकीत आम आदमी पार्टी, काँग्रेस आणि भाजप पक्षाची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. आज दिल्ली विधानसभेच्या रिंगणात उतरलेल्या 672 उमेदवारांचे भवितव्य ठरणार आहे. दिल्लीतील एक कोटी पेक्षा जास्त नोंदणीकृत मतदार आहेत. आज हे सर्व मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. मतदानादरम्यान, कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी दिल्लीत पोलिस बंदोबस्त करण्यात आला आहे.

दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल यांनी मतदानाच्या पूर्वसंध्येला संकटमोचक हनुमानाच्या मंदिरात जाऊन पूजा केली. तसेच दिल्ली प्रदेश भाजपचे अध्यक्ष खासदार मनोज तिवारी यांनी कालकाजी देवीच्या मंदिरात भाजपच्या विजयाचे साकडे घातले. आज दिल्लीमध्ये आम आदमी पार्टी, काँग्रेस आणि भाजपा असा तिरंगी सामना रंगणार आहे. दिल्ली प्रचारसभांवेळी भाजप पक्षाने शाहीन बागचा मुद्दा उचलून धरला होता. तसेच आपने जनतेला मागच्या 5 वर्षात दिल्लीतील विकासकामांचा आढावा देत भविष्यातही अशा सुधारणांमध्ये वाढ केली जाईल, असा विश्वास दिला. त्यामुळे दिल्लीतील जनता आता कोणाला कौल देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (हेही वाचा - दिल्ली विधानसभा निवडणूक 2020: मतदान करताना EVM मशिन बिघडल्याच्या तक्रारी ; 8 फेब्रुवारी 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE)

2015 मध्ये दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीत आप पक्षाचे 67 उमेदवार निवडून आले होते. तर भाजप पक्षाला दिल्लीमध्ये केवळ तीन जागांवर विजय मिळवता आला होता. त्यामुळे यंदाही आम आदमी पक्ष दिल्लीत आपलं सरकार स्थापन करणार का? यासर्वांकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.