Vizag Gas Leakage: गॅस गळतीमुळे 11 ठार, मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांनी मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 1 कोटी रुपयांची मदतीची केली घोषणा
एनडीआरएफचे डीजी एसएन प्रधान म्हणाले की मृतांची संख्या 11 झाली असल्याचे नुकताच कळविण्यात आले आहे. दुसरीकडे, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वाय.एस. जगनमोहन रेड्डी यांनी या अपघातात ठार झालेल्यांच्या कुटुंबियांना प्रत्येक एक कोटी रुपयांचे अनुदान जाहीर केले आहे.
विशाखापट्टणम (Visakhapatnam) गॅस गळती अपघातात 11 जणांचा मृत्यू झाला आहे. एनडीआरएफचे डीजी एसएन प्रधान (SN Pradhan) म्हणाले की मृतांची संख्या 11 झाली असल्याचे नुकताच कळविण्यात आले आहे. दुसरीकडे, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वाय.एस. जगनमोहन रेड्डी (YS Jagan Mohan Reddy) यांनी या अपघातात ठार झालेल्यांच्या कुटुंबियांना प्रत्येक एक कोटी रुपयांचे अनुदान जाहीर केले आहे. गुरुवारी सकाळी आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणममध्ये गॅस गळतीचे वृत्त समोर आले. इथे केमिकल प्लांटमधून गळलेला गॅस दूरवर पसरला. या अपघातात गॅसचा परिणाम झालेल्या लोकांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे आणि सध्या त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. यापूर्वी राज्याचे मुख्यमंत्री वाय.एस. जगन मोहन रेड्डी यांनी किंग जॉर्ज रुग्णालयात दाखल झालेल्यांना भेट दिली. दरम्यान, गॅस गळतीमुळे जवळपास राहणाऱ्या लोकांवर याचा परिणाम झाला असल्याचे म्हटले जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. त्यांनी ट्विट करून सर्वांच्या सुरक्षिततेसाठी प्रार्थना केली. (Vizag Gas Leak: विशाखापट्टणम गॅस गळती दुर्घटनेमुळे विराट कोहली, युवराज सिंह समवेत खेळाडू दुःखी, रुग्णालयात असलेल्या लोकांसाठी केली प्रार्थना)
"वायू गळतीमध्ये जीव गमावल्याच्या कुटूंबाला प्रत्येकी 1 कोटी रूपये देण्यात येणार आहेत, तर व्हेंटिलेटरवर असलेल्यांना 10 लाख रुपयांची मदत दिली जाईल," आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वाय.एस. जगनमोहन रेड्डी यांनी सांगितले. गुरुवारी पहाटे अडीच वाजता गॅस वाल्व खराब झाला आणि विषारी गॅस बाहेर पडला. या अपघाताची माहिती देताना एनडीएमएने मोठी माहिती दिली आहे. सुरुवातीच्या तपासणी अहवालात असे आढळले की गॅस वाल्व्हमधील अडचणीमुळे हा अपघात झाला आहे. एनडीएमएने सांगितले की या अपघातात 300 हून अधिकांना रुग्णालयात दाखल आले असून यापैकी 80 जणांना व्हेंटिलेटर लावण्यात आले आहे.
दुसरीकडे, राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाने (एनएचआरसी) आंध्र प्रदेश सरकार आणि केंद्राला या गॅस गळतीमुळे मृत्यू आणि लोकांचे होणारे नुकसान याबद्दल नोटीस बजावली आहे. आयोगाने राज्याच्या मुख्य सचिवांकडून उपचार आणि बचाव कार्याचा सविस्तर अहवाल मागविला आहे. यासह आंध्रच्या पोलिस महासंचालकांनाही नोटीस बजावण्यात आली आहे.