Vinesh Phogat, Bajrang Punia to Join Congress: विनेश फोगट आणि बजरंग पुनिया आज काँग्रेसमध्ये प्रवेश करणार; विधानसभा निवडणूक लढवण्याची शक्यता

राहुल गांधी यांची भेट घेतल्यानंतर कुस्तीपटू विनेश फोगट आणि बजरंग पुनिया यांनी काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस केसी वेणुगोपाल यांचीही भेट घेतली.

Vinesh Phogat, Bajrang Punia, Rahul Gandhi (Photo Credit - X/@thind_akashdeep)

Vinesh Phogat, Bajrang Punia to Join Congress: हरियाणा विधानसभा निवडणुकीची 2024 (Haryana Assembly Election 2024) ची लढत रंजक बनली आहे. निवडणुकीला महिनाभरापेक्षा कमी कालावधी शिल्लक आहे. अशातच आता कुस्तीपटू बजरंग पुनिया (Bajrang Punia)आणि विनेश फोगट (Vinesh Phogat) शुक्रवारी दिल्लीत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे (Mallikarjun Kharge) यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस (Congress) मध्ये प्रवेश करणार आहेत. दुपारी अडीचच्या सुमारास दोन्ही पैलवान काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत.

कुस्तीपटू विनेश फोगट आणि बजरंग पुनिया यांनी गेल्या गुरुवारी दिल्लीत काँग्रेस खासदार राहुल गांधी यांची भेट घेतली होती. राहुल गांधी यांची भेट घेतल्यानंतर कुस्तीपटू विनेश फोगट आणि बजरंग पुनिया यांनी काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस केसी वेणुगोपाल यांचीही भेट घेतली. तेव्हापासून दोघेही काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा होती. (हेही वाचा -Vinesh Phogat, Bajrang Punia Meet Rahul Gandhi: विनेश फोगट, बजरंग पुनिया यांनी घेतली राहुल गांधी यांची भेट)

बजरंग आणि विनेश यांनी घेतली राहुल गांधी यांची भेट -

हरियाणा निवडणुकीसंदर्भात शुक्रवारी काँग्रेस स्क्रीनिंग कमिटीची बैठक होत आहे. अजय माकन, भूपेंद्र हुडा या बैठकीला पोहोचले आहेत. काँग्रेसच्या उमेदवारांच्या यादीत बजरंग पुनिया आणि विनेश फोगट यांचीही नावे असू शकतात, अशी अटकळ बांधळी जात आहे.  (हेही वाचा; Haryana Assembly Election 2024: काँग्रेसने 34 उमेदवार केले निश्चित, 22 विद्यमान आमदारांच्या नावांचाही समावेश; 'या' जागेवरचा पेच कायम)

आज संध्याकाळी काँग्रेसच्या सीईसी बैठकीत जागांवर पुन्हा चर्चा होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अंतिम झालेल्या 66 जागांवरही पुन्हा चर्चा होणार आहे. गुरुवारच्या बैठकीत कुमारी शैलजा यांनी त्यांच्या वतीने 90 नावांची यादी दिली होती. मिळालेल्या माहितीनुसार, कुमारी शैलजा, भूपेंद्र हुड्डा आणि रणदीप सिंह सुरजेवाला यांना त्यांच्या समर्थकांना जास्तीत जास्त जागा मिळवायच्या आहेत. काँग्रेसच्या सर्व सर्वेक्षणानुसार हरियाणात सरकार स्थापन करण्यात पक्षाला यश येत असल्याचे चित्र आहे.



संबंधित बातम्या

NZ vs ENG 3rd Test 2024 Day 4 Live Streaming: न्यूझीलंड विजयापासून 8 विकेट दूर, जाणून घ्या चौथ्या दिवसाचे थेट प्रक्षेपण कधी, कुठे आणि कसे पहायचे

PAK vs SA 1st ODI 2024 Mini Battle: पाकिस्तान विरुद्ध दक्षिण आफ्रिका, पहिल्या वनडेच्या मिनी बॅटलमध्ये होणार चुरशीची स्पर्धा, हे खेळाडू सामन्याचा निर्णय बदलू शकतात

PAK vs SA 1st ODI 2024 Preview: पाकिस्तान विरुद्ध दक्षिण आफ्रिका पहिला एकदिवसीय सामना पार्लमध्ये खेळला जाणार, सामन्यापूर्वी हेड टू हेड रेकॉर्ड, मिनी बॅटल, स्ट्रीमिंगसह सर्व तपशील घ्या जाणून

IND-W vs WI-W 2nd T20I 2024 Preview: वेस्ट इंडिजला दुसऱ्या T20 मध्ये पुनरागमन करणार, की भारतीय महिला मालिका जिंकणार, सामन्यापूर्वी जाणून घ्या दोन्ही संघाचे हेड टू हेड रेकॉर्ड, मिनी लढाई, स्ट्रीमिंग यासह सर्व तपशील