Delhi IAS Coaching Centre Tragedy: Vikas Divyakirti यांच्याकडून दिल्ली कोचिंग सेंटर दुर्घटनेतील मृत विद्यार्थ्यांच्या कुटुंबियांना 10 लाख रुपयांची भरपाई जाहीर
त्यानंतर दोन्ही शिक्षकांनी मीडियासमोर आपले मत मांडले. दृष्टी कोचिंगचे संस्थापक विकास दिव्यकीर्ती यांनी प्रसिद्धीपत्रक जारी करून अपघातात मृत्युमुखी पडलेल्या चार विद्यार्थ्यांसाठी प्रत्येकी 10 लाख रुपयांची भरपाई जाहीर केली आहे.
Delhi IAS Coaching Centre Tragedy: गेल्या आठवड्यात राजधानी दिल्लीतील जुन्या राजेंद्र नगर (Rajendra Nagar) येथील राव यांच्या आयएएस कोचिंग सेंटर (Delhi IAS Coaching Centre) च्या तळघरात सुरू असलेल्या बेकायदेशीर लायब्ररीत बुडून तीन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. याशिवाय, काही दिवसांपूर्वी पटेल नगर परिसरात आणखी एका विद्यार्थ्याचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाला होता. यानंतर हजारो विद्यार्थ्यांनी रस्त्यावर उतरून कोचिंग सेंटरसमोर निदर्शने केली.
यादरम्यान संतप्त विद्यार्थ्यांनी दृष्टी आयएएस कोचिंग सेंटरचे संस्थापक विकास दिव्यकीर्ती (Vikas Divyakirti) आणि अवध ओझा सरांच्या विरोधात घोषणाबाजी केली. त्यानंतर दोन्ही शिक्षकांनी मीडियासमोर आपले मत मांडले. दृष्टी कोचिंगचे संस्थापक विकास दिव्यकीर्ती यांनी प्रसिद्धीपत्रक जारी करून अपघातात मृत्युमुखी पडलेल्या चार विद्यार्थ्यांसाठी प्रत्येकी 10 लाख रुपयांची भरपाई जाहीर केली आहे. (हेही वाचा -Delhi IAS Coaching Center Tragedy: दिल्ली कोचिंग सेंटर दुर्घटनेप्रकरणी SUV चालक Manuj Kathuria ला जामीन मंजूर)
मृत विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 10 लाख रुपये देण्याची घोषणा -
जुने राजेंद्र नगर आणि पटेल नगर येथे घडलेल्या दोन घटनांबद्दल दृष्टी कोचिंगचे संस्थापक विकास दिव्यकीर्ती यांनी शोक व्यक्त केला आहे. दिल्लीच्या पटेल नगर भागात रस्त्याच्या कडेला असलेल्या गेटमध्ये विजेचा धक्का लागून नीलेश राय यांचा मृत्यू झाला, तर इतर तीन विद्यार्थी श्रेया यादव, तान्या सोनी आणि निविन डॅल्विन यांचा राव कोचिंग सेंटरमधील तळघरात बांधलेल्या लायब्ररीत बुडून मृत्यू झाला. (हेही वाचा -Delhi IAS Coaching Center Tragedy: दिल्ली अभ्यासिकेत पाणी घुसल्याने तिघांचा मृत्यू झाल्यानंतर IAS कोचिंग सेंटरचा मालक आणि समन्वयक ताब्यात)
दरम्यान, आता विकास दिव्यकीर्ती यांनी चारही विद्यार्थ्यांच्या कुटुंबाला 10 लाख रुपये देणार असल्याची घोषणा केली आहे. तसेच राव आयएएस कोचिंग सेंटरमध्ये शिकणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना मोफत कोचिंग आणि शैक्षणिक मदत देणार असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.