Telangana Road Accident: श्रध्दांजली अर्पण करून परतीच्या प्रवासात कारचा भीषण अपघात, पती पत्नीचा मृत्यू, घटना कॅमेरात कैद (Watch video)
खम्मम-सूर्यापेट राष्ट्रीय महामार्गावर एका कारच्या अपघातात जोडप्याचा अपघाती मृत्यू झाला आहे
Telangana Road Accident: तेलंगानाच्या खम्मम जिल्ह्यात, खम्मम-सूर्यापेट राष्ट्रीय महामार्गावर एका कारच्या अपघातात जोडप्याचा अपघाती मृत्यू झाला आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. जेव्हा त्यांच्या कारचे नियंत्रण सुटले, ते दुभाजकाला धडकले आणि कार उलटले. या घटनेत त्यांचा मृत्यू झाला. मिळालेल्या माहिती नुसार,धक्कादायक म्हणजे जोडपे नातेवाईकांना श्रद्धांजली अर्पण करून ते परतीच्या प्रवासावर होते. दरम्यान त्याचा अपघात झाला. पतीचा जागीच मृत्यू झाला तर, तर पत्नीचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. 27 सप्टेंबर रोजी आपल्या आजोबांच्या अंत्यसंस्कारासाठी आपल्या कुटुंबासह संतोष उपस्थित होते आणि शुक्रवारी संध्याकाळी घरी परतत असताना हा अपघात झाला.
ఖమ్మం జాతీయ రహదారిపై కారు ఏక్సిడెంట్లో భార్య, భర్త మృతి#IndraSenaReddy #traffic #highways pic.twitter.com/Hmb0nJDJFC
— M.INDRASENAREDDY (@indrasena9966) October 1, 2023
(The above story first appeared on LatestLY on Oct 01, 2023 03:34 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

