Uttarakhand Glacier Burst Updates: उत्तराखंडमधील चामोली जिल्ह्यात दुर्घटनेनंतर बचावकार्य सुरूचं; आतापर्यंत 36 मृतदेह सापडले, 204 लोक बेपत्ता
तपोवन टनेलमधून गाळ काढण्यासाठी सर्वात मोठी एक्सावेटर मशीन मागवण्यात आली आहे. या मशीनच्या साहाय्याने बोगद्यातील गाळ काढण्याचं काम सुरू आहे.
Uttarakhand Glacier Burst Updates: उत्तराखंडच्या चामोली येथे आपत्तीनंतर बचावकार्य सुरूचं आहे. या मदतकार्यात आयटीबीपीबरोबरचं सैन्य दल, एनडीआरएफ, एसडीआरएफ आणि स्थानिक पोलिस सहभागी आहेत. आतापर्यंत 36 जणांचे मृतदेह सापडले आहेत. राज्य सरकारच्या मते आणखी 204 जण बेपत्ता आहेत. बेपत्ता नागरिकांचा शोध सुरू आहे. गुरुवारी दुपारच्या सुमारास ऋषीगंगा नदीच्या पाण्याची पातळी अचानक वाढ झाली. त्यामुळे याठिकाणी बचावकार्य काही काळ थांबवावे लागले. यानंतर निवडक सदस्यांच्या टीमसह बचावकार्य पुन्हा सुरू करण्यात आले. सध्या तपोवन बोगद्याच्या आतमध्ये मशिनच्या साहाय्याने मलबा काढण्याचं काम सुरू आहे. (वाचा - Google CEO सुंदर पिचाई यांच्यासह 18 जणांविरोधात गुन्हा दाखल; काय आहे प्रकरण? घ्या जाणून)
तपोवन टनेलमधून गाळ काढण्यासाठी सर्वात मोठी एक्सावेटर मशीन मागवण्यात आली आहे. या मशीनच्या साहाय्याने बोगद्यातील गाळ काढण्याचं काम सुरू आहे. आपत्ती व्यवस्थापन प्राधिकारणाने उत्तराखंडच्या हिमालय परिसरात भूकंप सेन्सर लावण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी 15 सेन्सर लावण्यात येणार आहेत.
दरम्यान, अलकनंदावरील ग्लेशियर तुटल्यानंतर सरोवर भरले आहेत. या तलावात लाखो क्युसेक पाणी भरले आहे. चामोली जिल्ह्यात हिमकडा तुटल्याने मोठ नुकसान झालं आहे. चामोली जिल्ह्यातील थराली तालुक्यातील फल्दिया गावातील 12 कुटुंबाला सुरक्षितस्थळी नेण्यात आलं आहे. या कुटुंबाच्या पुनर्वसनासाठी 51 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)