Uttarakhand News: वनविभाग कर्मचारींच्या इलेक्ट्रॉनिक वाहनाचा भीषण अपघात, चार जणांचा जागीत मृत्यू,१ बेपत्ता

उत्तराखंड येथील पौरी जिल्ह्यातील लक्ष्मण झुला पोलिस स्टेशन हद्दीतील चिला बॅरेज पॉवर हाऊसजवळ एका इलेक्ट्रॉनिक वाहनाचा अपघात झाला.

Uttarakhand PC TWitter

Uttarakhand News: उत्तराखंड येथील पौरी जिल्ह्यातील लक्ष्मण झुला पोलिस स्टेशन हद्दीतील चिला बॅरेज पॉवर हाऊसजवळ एका इलेक्ट्रॉनिक वाहनाचा अपघात झाला. या घटनेत चार जणांचा मृत्यू झाला आहे. तांत्रित बिघाडामुळे वनविभागाच्या वाहनाचा अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे. वाहनात अपघातावेळी 10 वनविभागाचे कर्मचारी होते. त्यापैकी चार जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आणि सहा जण जखमी झाले. दोन रेंजर आणि एका वॉर्डनसह या वाहानाचा अपघात चिल्ला पॉवर हाऊस जवळ झाला.

मिळालेल्या माहितीनुसार,  सोमवारी वनविभागाच्या वाहनाचा भीषण अपघात झाला आहे.या दुर्घटनेत चार जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. घटनेची माहिती कळतात प्रशासन घटनास्थळी दाखल झाले. एसडीआरएफच्या पथकाने वाहनात अडकलेल्या पाच जखमींना बाहेर काढले. त्यांना उपचारासाठी ऋषिकेश येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. या अपघातात एक महिला वन विभाग कर्मचारी कालव्यात पडली. बेपत्ता महिला कर्मचारीचा शोध घेण्याचे काम सुरु आहे. तर रात्री ही शोधमोहिम अंधारामुळे थांबवण्यात आली होती.

या घटने बाबत उत्तराखंडच्या वन मंत्र्यांनी कर्मचाऱ्यांच्या मृत्यू बाबत शोक व्यक्त केला आहे. रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्यांवर उपचार सुरु आहे. मी देवाला प्रार्थना करतो की शोकग्रस्त कुटुंब परिस्थितीला सामोरे जाण्याचे धैर्य मिळू देत अशी पोस्ट लिहून शेअक केली आहे. “हा अपघात कसा झाला याच्या तपशीलाची प्रतीक्षा आहे. बेपत्ता वन कर्मचाऱ्यांचा शोध सुरू आहे.