Uttar Pradesh Accident: 4 वर्षांच्या मुलासह कुटुंबातील 5 जण ठार, उत्तरप्रदेशात भीषण अपघात

उत्तर प्रदेशातील हरदोई भागात एक अपघात झाला.ज्यात एकाच कुटुंबातील पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

Uttar Pradesh Accident: 4 वर्षांच्या मुलासह कुटुंबातील 5 जण ठार, उत्तरप्रदेशात भीषण अपघात
Accident (PC - File Photo)

Uttar Pradesh Accident: उत्तर प्रदेशातील हरदोई भागात एक अपघात झाला.ज्यात एकाच कुटुंबातील पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. कार एका झाडाला आदळल्याने हा अपघात झाला. ही घटना सोमवारी सांयकाळी उशिरा बिल्हौर- कटरा महामार्गावर झाली. कारचालकाचे गाडीवरिल नियत्रंण सुटल्याने कार थेट झाडाला आदळली. या घटनेत कारमधील उपस्थित सर्वांना गंभीर दुखापत झाली. या घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील हरदोई भागातील बिल्होर- कटरा महामार्गावर हा अपघात झाला.बरकांठ गावातून नायगावकडे जात असताना अचानक वाहनावरील नियंत्रण सुटले आणि कार झाडाला आदळली. या अपघातात कारमधील सर्वजण गंभीर जखमी झाले. धक्कादायक म्हणजे कार मध्ये अवघ्या ४ वर्षांचे मुलगा होता. त्याला देखील गंभीर जखम झाली. पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच, घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी जखमींना रुग्णालयात दाखल केले.

रुग्णालयात डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. पोलिसांनी ही घटना कुटुंबियातील इतर सदस्यांना सांगितली. घटनेची अधिक माहिती तपासण्यात येत आहे असे पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले. पुढील कारवाई सुरु आहे.

(The above story first appeared on LatestLY on Oct 31, 2023 08:49 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).