Uttar Pradesh Crime: मायलेकाच्या नात्याला काळिमा! उत्तर प्रदेशच्या शहाजहाँपूरमध्ये मुलाने जन्मदात्या आईलाच जिवंत पेटवून दिले
यातच शहाजहाँपूर (Shahjahanpur) येथे घरगुती वादातून एका व्यक्तीने आपल्या पत्नीसह मिळून आपल्या आईलाच जिवंत पेटवून दिल्याने एकच खळबळ माजली आहे.
उत्तर प्रेदशमध्ये (Uttar Pradesh) एकामागे एक धक्कादायक घटना घडत असल्याने संपूर्ण राज्य हादरून गेले आहे. यातच शहाजहाँपूर (Shahjahanpur) येथे घरगुती वादातून एका व्यक्तीने पत्नीसह मिळून आपल्या आईलाच जिवंत पेटवून दिल्याची घटना उघडकीस आली आहे. यात पीडित महिला गंभीर जखमी झाली असून जवळच्या रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरु होते. मात्र, आज उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी मृत महिलेचा मुलगा आणि सुनासह अन्य दोन जणांना ताब्यात घेतले असून त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तसेच या घटनेच्या पुढील तपासाला पोलिसांनी सुरुवात केली आहे.
रत्ना देवी (वय, 58) असे मृत महिलेचे नाव आहे. रत्ना आणि त्यांचा मुलगा आकाश यांच्यात गेल्या काही दिवसांपासून घरगुती वाद सुरु होते. यामुळे रविवारी नातेवाईकांनी रत्ना देवी आणि आकाश यांची समजूतदेखील काढली होती. परंतु, आज सकाळी रत्ना देवी झोपलेली असताना आकाश आणि त्याची पत्नी दिपशिखा हिच्यासह अन्य दोघांनी मिळून त्यांच्या अंगावर रॉकेल ओतून पेटवून दिले. त्यावेळी रत्ना यांचा ओरडण्याचा आवाज ऐकून शेजाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर शेजाऱ्यांनी रत्ना यांना वाचवले आणि रुग्णालयात दाखल केले. मात्र, आज उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला, अशी माहिती पोलीस अधिक्षक अपर्णा गौतम यांनी दिली आहे. हे देखील वाचा-Bengaluru: 24 हजार रुपयांचे भाडे न मिळल्याने महिलेकडून भाडेकरुवर चाकू हल्ला
महिलेची प्रकृती चिंताजनक असल्याने वैद्यकीय महाविद्यालयात तिच्यावर उपचार सुरु होते. परंतु, आज उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती एका वेबसाईटने दिली आहे. या घटनेवर संपूर्ण उत्तर प्रदेशातून संतापजनक प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. तसेच या प्रकरणातील दोषीना कठोर शिक्षा देण्यात यावी, अशा मागणीदेखील जोर धरला आहे. महत्वाचे म्हणजे, उत्तर प्रदेशमध्ये दिवसेंदिवस गुन्हेगारींच्या संख्येत वाढ होत असून ही देशासाठी एक चिंताजनक बाब आहे.