UPSC NDA/NA Exam 2021 साठी महिलांकरिता आजपासून रजिस्ट्रेशन सुरू; upsconline.nic.in वर करा नोंदणी

नॅशनल डिफेंस अकॅडमी मध्ये 370 तर नेवल अकॅडमी मध्ये 30 जागांसाठी याद्वारा भरती होणार आहे.

Representational Image (Photo Credits: ANI)

UPSC NDA/NA Exam 2021 साठी महिलांना रजिस्ट्रेशन करण्याची आजपासून संधी खुली होत आहे. ज्या महिलांना यासाठी अर्ज करायचा आहे, त्यांना UPSC च्या अधिकृत संकेतस्थळाला upsconline.nic.in ला भेट द्यावी लागणार आहे. दरम्यान UPSC NDA/NA Exam 2021 साठी महिलांना अर्ज करण्यासाठी 8 ऑक्टोबर पर्यंतचा कालावधी आहे.नक्की वाचा: NDA Exam 2021 मध्ये महिला उमेदवारांना सहभागी होण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या Interim Order जारी.

केवळ अविवाहित महिला उमेदवार यासाठी अर्ज करु शकणार आहेत. NDA/NA आणि Combined Defence Service (CDS) exams सध्या लांबणीवर टाकण्यात आली आहे. UPSC NDA/NA Exam यंदा 14 नोव्हेंबरला होणार आहे. यापूर्वी ही परीक्षा 5 सप्टेंबरला होणार होती पण ती लांबणीवर टाकण्यात आली. आता या परीक्षेद्वारे नॅशनल डिफेंस अकॅडमी (National Defence Academy ) मध्ये 370 तर नेवल अकॅडमी (Naval Academy) मध्ये 30 जागांसाठी याद्वारा भरती होणार आहे. या डिरेक्ट लिंक वर देखील अर्ज करू शकता.

12वी उत्तीर्ण असलेले किंवा यंदा परीक्षा असलेले उमेदवार यासाठी पात्र असतील. या महिन्याच्या सुरूवातीला सर्वोच्च न्यायालयाने पहिल्यांदाच महिलांना एनडीए ची दारं खुली केली आहेत. महिलांना संधी न देण्यावरून कोर्टाने केंद्र सरकार आणि लष्कराला देखील फटकारलं आहे.

देशामध्ये महिलांना एनडीए च्या परीक्षेपासून दूर ठेवणं हा त्यांच्यासोबतचा भेदभाव असल्याचं मत कोर्टाने नोंदवलं आहे आणि सरकारने यावरून त्यांच्या प्रक्रियेमध्ये बदल करावेत असे देखील सुचवले होते. अर्जात देण्यात आलेल्या माहितीनुसार, या प्रक्रियेमध्ये संविधानाच्या कलम 14, 15, 16,19 चे उल्लंघन होत असल्याचेही सांगण्यात आले होते.



संबंधित बातम्या