UPI Fraud: ऑनलाईन पेमेंट करताना सावधान! KYC, SIM आणि Bank च्या नावावर होऊ शकते फसवणूक
देशात डिजिटल व्यवहारात सर्वाधिक वाढ युनिफाईड पेमेंट इंटरफेसच्या (UPI) माध्यमातून होणाऱ्या व्यवहारात मोठी वाढ झाली आहे. यूपीआय ऑनलाईन पेमेंटच्या माध्यमातून आर्थिक व्यवहार करणे अगदी सोपे आहे.
भारतात डिजिटल (Online Payments) व्यवहार वाढले आहेत. देशात डिजिटल व्यवहारात सर्वाधिक वाढ युनिफाईड पेमेंट इंटरफेसच्या (UPI) माध्यमातून होणाऱ्या व्यवहारात मोठी वाढ झाली आहे. यूपीआय ऑनलाईन पेमेंटच्या माध्यमातून आर्थिक व्यवहार करणे अगदी सोपे आहे. परंतु, ऑनलाईन पेमेंटच्या नावाखाली सायबर गुन्हेगार (Cyber Crime) नागरिकांची फसवणूक करीत असल्याच्या अनेक घटना उघडकीस आल्या आहेत. नागरिकांची फसवणूक करण्यासाठी सायबर गुन्हेगार नवी शक्कल लढवत असल्याचे समोर आले आहे. याचपार्श्वभूमीवर ग्राहकांना सतर्क राहण्याचे बॅंकेकडून वारंवार आवाहन केले जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सायबर गुन्हेगार फोनद्वारे नागरिकांना त्यांच्या बॅंकेसंबंधित माहिती विचारायचे. मात्र, आता नागरिकांना फसवण्यासाठी सायबर गुन्हेगार नवीन शक्कल लढवत असल्याची माहिती मिळत आहे. दिल्ली पोलीस सायबर सेलने दिलेल्या माहितीनुसार, सायबर गुन्हेगार यूपीआय पेमेंटशी संबंधित नागरिकांची फसवणूक करीत आहेत. केव्हायसी अपडेटच्या नावाखाली, सिम किंवा बँक खाते बंद करण्याची भिती दाखवत नागरिकांना फसवले जात आहे. यासाठी सायबर गुन्हेगार बनावट वेबसाईट तयार करून नागरिकांना लिंक पाठवतात. हे देखील वाचा- NPCIL Recruitment 2021: न्यूक्लियर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये 107 जागांसाठी भरती, 'असा' करता येईल अर्ज
महत्वाचे म्हणजे, यूपीआय अॅप वापरकर्त्यांना त्यांचे पिन कधीही कोणाबरोबर शेअर न करण्याचे आवाहन केले जात आहे. जर असे केल्यास तुम्ही सहज सायबर गुन्हेगाराच्या जाळ्यात अडकले जाऊ शकतात. ज्यामुळे तुमच्या खात्यातील पैसे गायब होण्याची शक्यता आहे. यामुळे यापुढे तुमचा पिन कोणत्याही व्यक्तीबरोबर शेअर करू नका. यूपीआय पिन तुमचे आर्थिक व्यवहार सुरक्षित करतो. त्याशिवाय, व्यवहार होऊ शकत नाही.