UP Crime: भदोही येथे अर्धा जळलेला महिलेचा मृतदेह सापडला, बलात्कार आणि खून झाल्याचा संशय

उत्तर प्रदेशातील भदोही येथे महिलेचा अर्धा जळलेला मृतदेह सापडला आहे. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेवून पोस्टमार्टमासाठी पाठवला आहे.

Crime (PC- File Image)

UP Crime: उत्तर प्रदेशातील भदोही येथे एका महिलेचा अर्धा जळलेला मृतदेह (Deathbody) सापडला आहे. हा मृतदेह एका पेटीत सापडला आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. मृत्यू होण्यापूर्वी महिलेसोबत बलात्कार (Rape) झाल्याची अंदाज पोलीसांनी वर्तवला आहे. राष्ट्रीय महामार्ग 19 वरील लाला नगर टोल प्लाझाजवळ पडलेल्या एका बॉक्समधून काहीतरी जळल्याचा वास येत असल्याची माहिती मिळाली. पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि आतमध्ये एका महिलेचा अर्धा जळालेला मृतदेह आढळून आला, असे पोलिसांनी सांगितले.

घटनास्थळी भेट देणाऱ्या भदोहीच्या पोलिस अधीक्षक (एसपी) मीनाक्षी कात्यायन यांनी सांगितले की, मृत महिलेचे वय 20 आहे असा अंदाज पोलीसांनी लावला आहे आणि तिने पांढरा सूट घातला होता. हत्येपूर्वी तिच्यासोबत काही अनुचित प्रकार घडला असण्याची शक्यता  आहे.  तिची ओळख पटू नये म्हणून मृतदेह चेहऱ्यापासून कंबरेपर्यंत पेट्रोल टाकून जाळण्यात आल्याचे पोलीसांनी वृत्तांना माहिती दिली.

महिलेचे हातपाय दोरीने बांधलेले दिसत आहेत. पुरावे गोळा करण्यासाठी फॉरेन्सिक टीम आणि श्वान पथक घटनास्थळी पोहोचले असून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात येत आहे. महिलेची ओळख पटवण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे कात्यायन यांनी सांगितले. खुनापूर्वी बलात्कार झाल्याची शक्यता त्यांनी दर्शवली आहे. या घटनेअंतर्गत सर्वीकडून  तपासणी केली जाईल. लवकरच आरोपीला पकडण्यात येईल असं पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now