Watch Video: उत्तर प्रदेशमध्ये विद्यार्थिनींची छेड करू नका म्हणणाऱ्या शिक्षकाला मुलांकडून मारहण
ही घटना उत्तर प्रदेशमधील प्रयागराजजवळ घडली. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
अलिकडे मुलींची छेडछाड करण्याचे प्रकार वाढले आहे. अशातच विद्यार्थिनींची छेड काढू नका, असं म्हणणाऱ्या शिक्षकालाच बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना उत्तर प्रदेशमधील (Uttar Pradesh) प्रयागराजजवळ (Prayagraj) घडली.
या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याप्रकरणी पोलिसांनी शिक्षकाला मारहाण करणाऱ्या मुलांचा शोध घेणं सुरू केलं आहे. (हेही वाचा - बाईकवर 'पाक की दिवानी' लिहिल्याने गावकऱ्यांकडून तरुणांना मारहाण)
उत्तर प्रदेशमधील बालकरपूर येथील आर्दश जनता महाविद्यालयात आरोग्य तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले होते. यावेळी काही मुलांचा समुह याठिकाणी आला. या मुलांनी तेथील विद्यार्थिनींची छेड काढायला सुरूवात केली. यावर तेथील शिक्षकाने त्या मुलांना फटकारले. त्यानंतर या मुलांनी आपल्या कुटुंबातील इतर लोकांना बोलावले आणि शिक्षकांना वर्गातून बाहेर काढत काठ्यांनी बेदम मारहाण केली.
एएनआय ट्विट -
या प्रकरणातील आरोपींना लवकरच अटक करण्यात येईल, असं प्रयागराजच्या पोलीस अधीक्षकांनी सांगितलं आहे. दरम्यान, शिक्षकांना मारहाण करणाऱ्या मुलांवर गुन्हा दाखल झाला आहे. पोलिस या मुलांचा शोध घेत आहेत, अशी माहिती गंगापरचे पोलीस अधिकारी नागेंद्रसिंह यांनी एएनआय या अधिकृत वृत्तसंस्थेला दिली आहे.