Lucknow Crime News: लखनऊमध्ये भररत्यात दरोडेखोरांनी केली 1.25 लाखांची चोरी, घटना सीसीटीव्हीत कैद
उत्तर प्रदेशातील लखनऊ येथील सराफा बाजारात एका व्यावसायिकाला १,२५,००० रुपये लुटल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
Lucknow Crime News: उत्तर प्रदेशातील लखनऊ येथील सराफा बाजारात एका व्यावसायिकाला १,२५,००० रुपये लुटल्याची धक्कादायक घटना घडली आहे. बाजारात लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात ही चोरीची घटना कैद झाली आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. बाजारात दिवसाढवळ्या चोरट्यांनी व्यपाऱ्याला लुटलं आहे. चोरट्यांनी १,२५,००० चोरून घटनास्थळावरून पळ काढला. व्यापाऱ्याला पैसे चोरल्याची भनक लागू दिली नाही, एवढ्या चालाकीने चोरी केली आहे. ही चोरी एका टोळक्याने केली आहे. सायकल वरून आलेल्या एकाने व्यापाऱ्याला धडक दिली. व्यापाऱ्याचा पाठलाग करण्याऱ्या एका आरोपीने मागून त्याच्या खिशात हात घालून रोक रक्कम चोरली. घटनेनंतर लगेच आरोपी घटनास्थळावरून पसार झाला. या घटनेची माहिती पोलिसांत देण्यात आली आहे. लवकरच आरोपींना अटक करण्यात येईल अशी माहिती पोलिसांनी माध्यमांना दिली.