Mathura Train Accident: मथुरा रेल्वे अपघातावेळी ड्रायव्हर मोबाईलमध्ये व्यस्त, 5 जण निलंबित
रेल्वे एका फलाटावर चढली होती. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत होता
Mathura Train Accident: मंगळवारी मथुरा रेल्वे स्टेशनवर एक घटना घडली. रेल्वे एका फलाटावर चढली होती. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत होता. या घटनेअंतर्गत पोलीसांनी चौकशी केली तर एक सत्य समोर आले. मथुरा ट्रेन दुर्घटनेच्या वेळी ड्रायव्हर त्याच्या मोबाईलमध्ये व्यस्त होता. हा सर्व प्रकार सीसीटीव्हीच्या माध्यमातून उघडला आहे. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मथुरा जंक्शन रेल्वे स्थानकावर मंगळवारी एक ट्रेन प्लॅटफॉर्म क्रमांक दोनवर चढली. ट्रेन ऑपरेशन दरम्यान, रेल्वे कर्मचारी त्याच्या मोबाईल फोनवर काहीतरी पाहत होता आणि तो सुद्धा किंचित मद्यधुंद अवस्थेत असल्याची माहिती मिळाली आहे.
रेल्वे अपघाताच्या प्राथमिक कारणाचा संदर्भ देत अहवालात असे म्हटले आहे की, ट्रेन प्लॅटफॉर्मवर आल्यानंतर, सचिन नावाचा रेल्वे कर्मचारी डीटीसीमध्ये त्याच्या मोबाइल फोनवर काहीतरी पाहत असल्याचे दिसले आणि मध्य धुंद अवस्थेत होता.
अहवालात म्हटले आहे की त्याने आपली बॅग निष्काळजीपणे इंजिनच्या थ्रॉटलवर ठेवली आणि बॅगच्या दाबामुळे, थ्रोटल पुढे जाण्याच्या स्थितीत गेले, परिणामी EMU प्लॅटफॉर्मच्या दिशेने पुढे सरकले. आणि ट्रेन फलाटावर चढली. या घटनेमुळे प्रवाशी हैराण झाले होते. या घटने अंतर्गत ५ जणांना कामावरून निलंबित करून टाकले आहे.