7th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर; महागाई भत्त्यात 4 टक्क्यांची वाढ
आज झालेल्या कॅबिनेट मंत्रीमंडळाच्या बैठकीत केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात (Dearness Allowance) 4 टक्क्यांची वाढ करण्यात आली आहे. यासंदर्भात एएनआय या वृत्तसंस्थेने वृत्त दिलं आहे.
7th Pay Commission: मोदी सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांना खुशखबर दिली आहे. आज झालेल्या कॅबिनेट मंत्रीमंडळाच्या बैठकीत केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात (Dearness Allowance) 4 टक्क्यांची वाढ करण्यात आली आहे. यासंदर्भात एएनआय या वृत्तसंस्थेने वृत्त दिलं आहे.
या बैठकीत कोरोना व्हारसरच्या पार्श्वभूमीवर चर्चा करण्यात आली. हा महागाई भत्ता सर्व केंद्रीय कर्मचाऱ्यांना लागू होणार आहे. सातवा वेतन आयोग लागू झाल्यापासून सरकाने केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वेळोवेळी वाढ केली आहे. (हेही वाचा - 7th Pay Commission: शहरात 'एक्स', 'वाय' आणि 'झेड' श्रेणीत असलेल्या सरकारी कर्मचाऱ्यांना हाऊस रेंट अलाऊन्स किती मिळतो? कसा असतो HRA?)
केद्रींय कर्मचाऱ्यांना घरभाडे भत्ता, मुलांच्या शिक्षणासाठी शैक्षणिक भत्ता दिला जातो. मोदी सरकार केद्रींय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात दर सहा महिन्यांनी वाढ करत असते. महागाईचा सामना करण्यासाठी केंद्र सरकारने ही योजना आणली आहे. गेल्याच आठवड्यात केंद्रीय अर्थ राज्यमंत्री अनुराग सिंह ठाकुर यांनी राज्यसभेत लेखी स्वरूपात माहिती दिली होती. त्यानुसार, केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांना मार्चपासून महागाई भत्ता मिळणार आहे. जगात केवळ भारत, पाकिस्तान आणि बांगलादेशमध्येच कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता दिला जातो.