Budget 2025 Stocks To Watch: भारतीय शेअर बाजारास केंद्रीय अर्थसंकल्पामुळे ग्रीन सिग्नल? 'या' क्षेत्रासंदर्भात घोषणा होताच 'हे' शेअर्स वधारण्याची शक्यता
या सर्वसाधारण अर्थसंकल्पात विविध क्षेत्रांशी संबंधित अनेक घोषणा असू शकतात. जर मोठ्या घोषणा झाल्या तर या क्षेत्रांच्या शेअर्सवरही परिणाम होण्याची शक्यता आहे.
Budget 2025 Stocks To Watch: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Union Finance Minister Nirmala Sitharaman) आज संसदेत 11 वाजता 2025-26 या आर्थिक वर्षाचा सर्वसाधारण अर्थसंकल्प (Budget 2025) सादर करणार आहेत. या सर्वसाधारण अर्थसंकल्पात विविध क्षेत्रांशी संबंधित अनेक घोषणा असू शकतात. जर मोठ्या घोषणा झाल्या तर या क्षेत्रांच्या शेअर्सवरही परिणाम होण्याची शक्यता आहे. सहसा शेअर बाजार (Stock Market) शनिवारी बंद असतात. पण आज अर्थसंकल्पाचा दिवस असल्याने शेअर बाजार सुरू आहे. आज खालील क्षेत्रासंदर्भात मोठ्या घोषणा झाल्यास त्यासंदर्भातील कंपन्यांच्या शेअर्समध्ये चांगली तेजी दिसण्याची शक्यता आहे.
पायाभूत सुविधा -
यंदाच्या अर्थसंकल्पात पायाभूत सुविधांशी संबंधित मोठ्या घोषणा होऊ शकतात. जर असे झाले, तर एल अँड टी, आयआरबी इन्फ्रा, दिलीप बिल्डकॉन, केएनआर कन्स्ट्रक्शन, पीएनसी इन्फ्राटेक, केईसी इंटरनॅशनल, अहलुवालिया कॉन्ट्रॅक्ट्स, एचजी इन्फ्रा, जीआर इन्फ्रा आणि एनसीसी हे प्रमुख स्टॉक आहेत ज्यांवर सकारात्मक परिणाम दिसू शकतो. (हेही वाचा -Budget 2025: अर्थमंत्री निर्मला सीतारामन 1 फेब्रुवारी रोजी सादर करणार देशाचा अर्थसंकल्प; जाणून घ्या कधी, कसे आणि कुठे पाहाल थेट प्रक्षेपण)
रेल्वे -
जर 2025 च्या अर्थसंकल्पात रेल्वेशी संबंधित काही मोठ्या घोषणा असतील, तर RVNL, Jupiter Wagons, Titagarh, RITES आणि BEML सारख्या शेअर्सना गुंतवणूकदारांकडून चांगला प्रतिसाद मिळू शकतो. याशिवाय, एचबीएल पॉवर, केर्नेक्स मायक्रो, केईसी इंटरनॅशनल, रेलटेल, सीमेन्स, टेक्समॅको आणि टीटागढ यांचे शेअर्स देखील वाढण्याची शक्यता आहे. (हेही वाचा: Nirmala Sitharaman यांनी सादर केला Economic Survey 2025; जीडीपी 6.3% ते 6.8% राहण्याचा अंदाज)
शेती -
अर्थसंकल्पात शेतीशी संबंधित कोणतीही मोठी घोषणा झाली तर श्रीराम फायनान्स, एल अँड टी फायनान्स आणि महिंद्रा अँड महिंद्रा फायनान्स सारख्या समभागांना त्याचा फायदा होऊ शकतो.
संरक्षण उद्योग -
याशिवाय, केंद्र सरकारने सैन्याच्या आधुनिकीकरणाशी संबंधित मोठ्या घोषणा केल्या तर हिंदुस्तान एरोनॉटिक्स, भारत इलेक्ट्रॉनिक्स, भारत डायनॅमिक्स आणि सोलर इंडस्ट्रीज सारख्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठी वाढ होऊ शकते.
इलेक्ट्रिक वाहन -
तथापी, सरकारने इलेक्ट्रिक वाहन पुरवठा साखळीशी संबंधित कोणतीही घोषणा केली तर एक्साइड आणि अमारा राजा यांच्या शेअर्सना फायदा होऊ शकतो. चार्जिंग इन्फ्रास्ट्रक्चर आणि एनर्जी स्टोरेज सिस्टीमशी संबंधित घोषणांचा बजाज ऑटो, टीव्हीएस मोटर, ओला इलेक्ट्रिक, टाटा मोटर्स, एम अँड एम आणि जेबीएम ऑटोच्या शेअर्सवर सकारात्मक परिणाम होण्याची शक्यता आहे.
वीज -
अर्थसंकल्पात वीज क्षेत्राशी संबंधित मोठ्या घोषणा असतील तर गुंतवणूकदारांकडून या क्षेत्रातील शेअर्समध्ये चांगला प्रतिसाद दिसून येतो. वीज क्षेत्रातील समभागांमध्ये, प्रमुख म्हणजे एनटीपीसी, टाटा पॉवर, जेएसडब्ल्यू एनर्जी, एनएचपीसी, एसजेव्हीएन, सीईएससी, अदानी पॉवर, अदानी एनर्जी सोल्युशन्स आणि केपी एनर्जीच्या स्टॉकमध्ये तेजी दिसण्याची शक्यता आहे.
आरोग्य सेवा -
याशिवाय, अर्थसंकल्पात आरोग्यसेवेशी संबंधित मोठ्या घोषणा झाल्या तर गुंतवणूकदार फार्मा कंपन्यांच्या शेअर्सवर लक्ष केंद्रित करू शकतात. या क्षेत्रातील प्रमुख शेअर्समध्ये सन फार्मा, सिप्ला, डॉ. रेड्डीज आणि बायोकॉन यांचा समावेश आहे. जर आयुष्मान भारत योजनेचे बजेट वाढवले तर अपोलो हॉस्पिटल्स, मॅक्स हेल्थ, एस्टर डीएम हेल्थकेअर, किम्स आणि ज्युपिटरच्या शेअर्सवर परिणाम होऊ शकतो. ज्येष्ठ नागरिकांसाठी आरोग्य विमा प्रीमियममध्ये कपात केल्याने स्टार हेल्थ इन्शुरन्स, आयसीआयसीआय लोम्बार्ड आणि न्यू इंडिया अॅश्युरन्सच्या शेअर्सवर सकारात्मक परिणाम होऊ शकतो.
आयकर -
या अर्थसंकल्पात आयकरात सूट देण्यासारख्या घोषणा झाल्या किंवा ग्रामीण भागातील लोकांचे उत्पन्न वाढवण्याच्या घोषणा झाल्या तर त्याचा एफएमसीजी शेअर्सवर चांगला परिणाम होईल. यामुळे, डाबर, इमामी, एचयूएल आणि ब्रिटानिया सारखे स्टॉक फोकसमध्ये राहू शकतात.
गृहनिर्माण -
या अर्थसंकल्पात गृहनिर्माण क्षेत्राबाबतही अनेक घोषणा केल्या जाऊ शकतात. जर सरकारने परवडणाऱ्या घरांबाबत कोणतीही घोषणा केली तर आधार हाऊसिंग फायनान्स, अप्टस व्हॅल्यू, आवस फायनान्सियर्स आणि होम फर्स्ट फायनान्सच्या शेअर्सवर चांगला प्रतिसाद मिळू शकतो.
सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग -
यंदाच्या अर्थसंकल्पात एमएसएमईशी संबंधित योजना सुरू झाल्यामुळे, एसबीआय, पीएनबी, एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक, बजाज फायनान्स आणि एल अँड टी फायनान्सच्या शेअर्समध्ये चांगली वाढ दिसू शकते.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)