Indore Accident: अनियंत्रित ट्रक झोपडीवर पलटला, एकाचा मृत्यू, तीन जखमी

या अपघातात एकाचा मृत्यू झाला तर तीन जखमी झाले आहे. हा अपघात शुक्रवारी उशिरा रात्री घडला. धार रोडवर ट्रक पलटी होऊन एका झोपडीवर कोसळले.

Accident | (Photo credit: archived, edited, representative image)

Indore Accident: मध्य प्रदेशातील इंदौर येथे ट्रकचा भीषण अपघात झाला. या अपघातात एकाचा मृत्यू झाला तर तीन जखमी झाले आहे. हा अपघात शुक्रवारी उशिरा रात्री घडला. धार रोडवर ट्रक पलटी होऊन एका झोपडीवर कोसळले. ट्रक चालकाचे वाहनावरील ताबा सुटल्याने हा अपघात घडला. अपघाताची नोंद पोलिसांनी केली आहे. (हेही वाचा- राजस्थानच्या सिरोही येथे खासगी बसचा भीषण अपघात, बस नदीत कोसळल्याने 40 प्रवासी जखमी (Watch Video)

मिळालेल्या माहितीनुसार, इंदौर येथील धार रोडवर ट्रक जात होता. ट्रकवरील चालकावर नियंत्रण सुटले आणि पुढे जाऊन ट्रक पलटी झाला आणि एका झोपडीवर कोसळला. अपघाता झाला तेव्हा झोपडीत तीन ते चार झोपेत होते. त्यातील एकाचा मृत्यू झाला. ट्रक चालक मद्यधुंद होता अशी माहिती समोर आली आहे.

मनीष (३२), त्याचा भाऊ गोलू (२७) आणि त्याचे वडिल कमलराव (५०) ट्रकच्या खाली अडकले. हा अपघात इतका भीषण होता की, यात ट्रकचा अक्षरश: चुराडा झाला.  कमलराव आणि गोलू पळून जाण्यात यशस्वी झाले, तर झोपलेला मनीष अडकला आणि सुमारे 30 मिनिटे मदतीसाठी धडपडला. स्थानिकांनी त्याला वाचवण्याचे प्रयत्न करूनही त्याचा मृत्यू झाला.

अपघातानंतर अर्ध्या तासाने पोलीस आले आणि एका जेसीबीला ढिगारा हटवण्यास आणखी दीड तास लागला. पहाटे साडेतीनच्या सुमारास मनीषचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. पंधरा दिवसांपासून रस्त्यावरील दिवे बंद असल्याने अपघातात भर पडली होती. अपघातानंतर  रस्त्यावर बराच वेळ गोंधळ परिस्थिती निर्माण झाली. ट्रक चालक फरार झाल्याची माहिती समोर आली आहे. पोलिस या प्रकरणी तपास सुरु करत आहे.