Madhya Pradesh News: मोबाईल चोरणाऱ्या दोन चोरट्यांना अटक, इंदौर येथील घटना
दोन दिवसांपूर्वी मोबाईल चोरीच्या संशयावरून तरुणाने एका महिलेची हत्या केली
Madhya Pradesh News: मोबाईल चोरीच्या घटना वाढत चालल्या आहे. दोन दिवसांपूर्वी मोबाईल चोरीच्या संशयावरून तरुणाने एका महिलेची हत्या केली. दरम्यान मध्य प्रदेशातील इंदौर येथील शहर गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी विजय नगर भागातील एका व्यक्तीकडून मोबाईल हिसकावून घेतल्याचा प्रकार घडला होता. या प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. त्यांच्याकडून मोबाईल जप्त करण्यात आला असून त्यांची चौकशी करण्यात येत आहे. ( हेही वाचा- रुग्णालयातून बाळाची चोरी, खळबळजनक घटनेचा व्हिडिओ आला समोर)
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ३ फेब्रुवारी रोजी विजय नगर परिसरात एका व्यक्तीचा मोबाईल फोन दोन दुचाकीस्वारांनी हिसकावून चोरी केला होता. या प्रकरणी पोलिसांनी अज्ञात व्यक्तींविरुध्दात भारतीय दंड कलम ३९२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. एका व्यक्तीकडून चोरलेला मोबाईल दोन जण विकण्याच्या प्रयत्नात असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली होती. विजय नगर पोलिस कर्मचाऱ्यांसह गुन्हे शाखेने आरोपीला अटक केली. अभिषेक आणि आशिष अशी त्यांची नावे असून ते इंदौर येथील विजय नगर परिसरातील रहिवासी आहेत. पोलिसांनी पकडल्यानंतर आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली.
मोबाईल चोरीच्या घटनेनतंर परिसरात खळबळ उडाली होती. पोलिसांनी परिसरात मोबाईल चोरट्यांपासून सावध रहा असा सल्ला देखील दिला. बुधवारी तेजाजी नगर येथून एका व्यक्तीचा स्कूटर चोरण्यात आला होता. पोलिसांनी आरोपीला अटक केले. पोलिसांना गुप्त माहितीच्या आधारे आरोपीला स्कूटर सहित पकडले.