Madhya Pradesh News: मध्य प्रदेशात पिकअप व्हॅन पडल्याने दोघांचा मृत्यू, चार जण गंभीर जखमी

कालीबावडी रस्त्यावर सेमलदाजवळील ओंकारेश्वर कालव्यात पिकअप व्हॅन पडल्याची माहिती समोर आली आहे.

Madhya Pradesh News: मध्य प्रदेशात पिकअप व्हॅन पडल्याने दोघांचा मृत्यू, चार जण गंभीर जखमी
Accident (PC - File Photo)

Madhya Pradesh News: मध्य प्रदेशातील (Madya Pradesh) धार जिल्ह्यात धामनोद पोलिस ठाण्याच्या हद्दीतील कालीबावडी रस्त्यावर सेमलदाजवळील ओंकारेश्वर कालव्यात पिकअप व्हॅन पडल्याची माहिती समोर आली आहे. धक्कादायक म्हणजे या अपघातात (Accident) पिता पित्राचा दुर्दैवी मृत्यू झाला तर चार जण जखमी झाले. विजय कुशवाह आणि रुद्राक्ष (7) अशी या अपघातात मृत झालेल्यांची नावे आहे. जखमी झालेल्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघातावेळी वाहनात एकुण सात जण होते. ते सर्वजण मजूर आहे. घटनेतील पुढील तपास सुरु आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, विजय शेतात मजुरांची ने- आण करत होतो तेव्हा अपघात घडला. पिकअप व्हॅन अनियंत्रित झाल्याने कालव्यात पडली. या अपघातात चार जण जखमी झाले आणि दोघांचा मृत्यू झाला. यश कुशवाह (19), ज्योती अशोक (30), गायत्री कुशवाह (30), कालीबाई जीवन (50) यांच्यासह चार जण जखमी झाले असून त्यांना सामुदायिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. अपघातावेळी वाहनात एकूण सात मजूर होते. (हेही वाचा-  रुग्णवाहिकेचा भीषण अपघात, 4 जण जागीच ठार, अपघात कॅमेऱ्यात कैद)

या अपघाताची पुढील तपासणी सुरु केली आहे. पोलिसांनी घटनास्थळी येऊन दोघांचे मृतदेह कालव्यातून बाहेर काढले आहे. दोघांचे मृतदेह पोस्टमार्टसाठी पाठवण्यात आले आहे. धामनोद पोलिस ठाण्यात या अपघाताची नोंद घेण्यात आली आहे. या अपघातामुळे परिसरात मोठी शांतता पसरली आहे.

 

(The above story first appeared on LatestLY on Dec 03, 2023 08:03 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).