Vaishno Devi Temple: वैष्णोदेवी मंदिरात चेंगराचेंगरी, 12 जणांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी

जखमींना माता वैष्णोदेवी नारायण सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलसह इतर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. अनेक जखमींची प्रकृती चिंताजनक आहे.

(Photo Credit - Twitter)

जम्मू-काश्मीरमध्ये (Jammu & Kashmir) नववर्षानिमित्त माता वैष्णोदेवी मंदिरात (Stampede at Mata Vaishno Devi Bhawan) चेंगराचेंगरी झाल्याची बातमी समोर आली आहे. यामुळे आतापर्यंत 12 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 20 जण जखमी झाल्याची माहिती आहे. जखमींपैकी अनेकांची प्रकृती चिंताजनक आहे. मदत आणि बचाव कार्य सुरू आहे. भाविकांच्या प्रचंड गर्दीमुळे चेंगराचेंगरी झाल्याचे सांगितले जात आहे. त्रिकुटा टेकडीवर असलेल्या मंदिराच्या परिसरात ही घटना घडली. मिळालेल्या माहिती नुसार नवीन वर्षाच्या प्रारंभानिमित्त भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली आहे. दरम्यान, चेंगराचेंगरी झाली. मिळालेल्या वृत्तानुसार अधिका-यांनी सांगितले की अनेक लोक मृत आढळले आणि त्यांचे मृतदेह ओळख आणि इतर कायदेशीर औपचारिकतेसाठी रुग्णालयात पाठवण्यात आले. जखमींना माता वैष्णोदेवी नारायण सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलसह इतर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. अनेक जखमींची प्रकृती चिंताजनक आहे.

Tweet

पंतप्रधान मोदींनी ट्विट करून केले शोक व्यक्त 

माता वैष्णो देवी भवनात झालेल्या चेंगराचेंगरीत लोकांचा मृत्यू झाल्यामुळे अत्यंत दु:ख झाले, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट केले. शोकग्रस्त कुटुंबियांच्या सांत्वना केले आहे तसेच जखमी लवकर बरे होतील. जम्मू-काश्मीरचे राज्यपाल मनोज सिन्हा, मंत्री जितेंद्र सिंह आणि नित्यानंद राय यांच्याशी बोलून परिस्थितीचा आढावा घेतला. मृतांमध्ये दिल्ली, हरियाणा, पंजाब आणि जम्मू-काश्मीरमधील लोकांचा समावेश आहे. याप्रकरणी अधिक माहिती मिळण्याची प्रतीक्षा आहे. तसेच प्रवासही बंद करण्यात आला आहे. PMO च्या वतीने ट्विट करून सांगण्यात आले आहे की, चेंगराचेंगरीत जीव गमावलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या कुटुंबाला PMNRF कडून 2 लाख रुपये आणि जखमींना 50,000 रुपये मदत दिली जाईल. (हे ही वाचा Rahul Gandhi On BJP: मोदी सरकारचं अजून एक आश्वासन ठरलं खोटं, राहुल गांधींची टीका.)

Tweet

 

जम्मू आणि काश्मीरचे लेफ्टनंट गव्हर्नर मनोज सिन्हा यांच्या कार्यालयाने ट्विट केले की, चेंगराचेंगरीत प्राण गमावलेल्यांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 10 लाख रुपये आणि जखमींना 2 लाख रुपये मदत दिली जाईल. जखमींच्या उपचाराचा खर्च श्राइन बोर्ड उचलणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा केली. त्यांना घटनेची माहिती दिली. माननीय पंतप्रधानांनी सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले आहे. माता वैष्णो देवी मंदिरात झालेल्या चेंगराचेंगरीमुळे झालेल्या जीवितहानीबद्दल खूप दुःख झाले. मृतांच्या कुटुंबीयांना माझ्या संवेदना आणि जखमींसाठी प्रार्थना.

Tweet

अर्ध्या लोकांची चेंगराचेंगरी झाली- डीजीपी

जम्मू-काश्मीरचे डीजीपी दिलबाग सिंह म्हणाले, कटरा येथील माता वैष्णो देवी भवनात झालेल्या चेंगराचेंगरीत 12 जणांचा मृत्यू झाला आहे. ही घटना पहाटे 2:45 वाजता घडली आणि प्राथमिक माहितीनुसार कशावरून तरी वाद झाला, परिणामी लोकांनी एकमेकांना धक्काबुक्की केली आणि नंतर चेंगराचेंगरी झाली.