Coronavirus Outbreak: देशात कोरोना रुग्णांची संख्या 433 वर, केरळमध्ये एकाच दिवसात 28 जणांना कोरोनाची लागण
आज देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 433 वर पोहचला आहे. केरळमध्ये एकाच दिवसात 28 जणांना कोरोनाची लागण झाली असून तेथील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 95 वर पोहचली आहे.
Coronavirus Outbreak: जगभरात थैमान घातलेल्या कोरोना व्हायरसने (Coronavirus) भारतात आपले पाय रोवले आहेत. आज देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 433 वर पोहचला आहे. केरळमध्ये (Kerala) एकाच दिवसात 28 जणांना कोरोनाची लागण झाली असून तेथील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 95 वर पोहचली आहे.
कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांनी राज्यातील सर्व जिल्ह्यातील सीमा बंद केल्या आहेत. तसेच सार्वजनिक वाहतूकदेखील बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयातून केवळ अत्यावश्यक सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांना सुट देण्यात आली आहे. विजयन यांनी घेतलेल्या निर्णयानुसार, राज्यामध्ये कोणात्याही व्यक्तीला राज्याबाहेर जाता येणार नाही. (हेही वाचा - Coronavirus: कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर धार्मिक स्थळ, सार्वजनिक अथवा खाजगी भागातील गर्दी टाळण्यासाठी मुंबई पोलिसांनी घेतला 'हा' महत्वाचा निर्णय)
कोरोना व्हायरसचे संक्रमण थांबवण्यासाठी राज्यातील धार्मिक स्थळेदेखील बंद करण्यात आली आहेत. संपूर्ण शहर 31 मार्चपर्यंत लॉकलाऊन ठेवण्यात येणार आहे, असे विजयन यांनी सांगितलं आहे. याव्यतिरिक्त महाराष्ट्रात आज नवीन 15 कोरोनाग्रस्त रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्यात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 89 वर पोहचली आहे, यासंदर्भात राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी माहिती दिली आहे.