Viral Video: वेळ हुकली, UPSC च्या उमेदवाराला नाकारले, परिक्षा केंद्रावर विद्यार्थ्यांसह पालक ढसाढसा रडले
काही ठिकाणी वेळच्या आभावी विद्यार्थी लवकर पोहचू शकले नाही. तर एकी कडे गुगपमॅपच्या गोंधळात परिक्षार्थी केंद्रावर पोहोचण्यास उशीर झाला
Viral Video: देशभरात रविवारी 16 जून रोजी UPSC ची प्रीलियम परिक्षा पार पडली. काही ठिकाणी वेळच्या आभावी विद्यार्थी लवकर पोहचू शकले नाही. तर एकी कडे गुगपमॅपच्या गोंधळात परिक्षार्थी केंद्रावर पोहोचण्यास उशीर झाला त्यामुळे ते परिक्षेपासून वंचित राहिले. या घटनेनंतर विद्यार्थ्यांसह आई वडिलांवर मोठा दुखाचा डोंगर कोसळला आहे. गुरुग्राममधील परिक्षा केंद्रात उशीरा पोहचल्यामुळे प्रवेश नकारला गेला. या घटनेनंतर तिच्या आई वडिलांना अश्रू अनावर झाले आहे. (हेही वाचा- Google Map च्या भरवश्यावर बसलेल्या यूपीएससीच्या 50 विद्यार्थ्यांना फटका; परिक्षा केंद्राचा रस्ता चुकल्याने परिक्षेपासून राहिले वंचित)
सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यात गुरुग्राम येथील परिक्षा केंद्रावर उशीरा पोहचलेल्या विद्यार्थींनी पालकांसह रडत आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये विद्यार्थींनीची आई बेशुध्द अवस्थेत पडली आहे. वडिलांची अवस्था बेहाल झाली आहे. या व्हिडिओवर अनेक वापरकर्त्यांनी प्रतिक्रीया दिल्या आहेत. अनेकांनी दुख व्यक्त केले आहे.
यूपीएससी प्रिलिम्स परिक्षेसाठी आपल्या मुलीसह आलेल्या पालकांची परिस्थिती पाहून अनेकांना अश्रू अनावर झाले आहे. विद्यार्थींनीचा एक वर्ष वाया गेल्यामुळे आई वडिलांनी हंबरडा फोडला आहे. मुलीला उशीर झाल्याने तीला परवानगी नाकारली. परिक्षा सकाळी 9.30 वाजता सुरु होते आणि ते सकाळी 9 वाजता गेटवर होते. पण त्यांना एसडी आदर्श विद्यालय सेक्टर 47, गुरुग्रामच्या मुख्याध्यापकांनी प्रवेश देण्यास नकार दिला.