चंदीगढ: वसतीगृहाला लागलेल्या भीषण आगीत 3 मुलींचा होरपळून मृत्यू
शहरातील सेक्टर 32 मध्ये ही घटना घडली. रिया, पाखी आणि मुस्कान, अशी या मृत मुलींची नावे आहेत. या आगीत या तीन मुली गंभीर जखमी झाल्या. त्यानंतर त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, त्यापूर्वीचं त्यांचा मृत्यू झाला.
चंदीगढमधील (Chandigarh) मुलींच्या वसतीगृहाला लागलेल्या भीषण आगीत (Fire) 3 मुलींचा होरपळून मृत्यू झाला आहे. शहरातील सेक्टर 32 मध्ये ही घटना घडली. रिया, पाखी आणि मुस्कान, अशी या मृत मुलींची नावे आहेत. या आगीत या तीन मुली गंभीर जखमी झाल्या. त्यानंतर त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, त्यापूर्वीचं त्यांचा मृत्यू झाला.
या आगीतून एका मुलीने पहिल्या मजल्यावरून उडी मारून आपला जीव वाचवला आहे. उडी मारल्याने तिला गंभीर दुखापत झाली. सध्या तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. (हेही वाचा - निर्भया सामूहिक बलात्कार प्रकरण: दोषी विनय शर्माची वैद्यकीय उपचार देण्यासंदर्भातील मागणी याचिका न्यायालयाने फेटाळली)
चंदीगढमधील सेक्टर 32 मधील इमारतीतच्या पहिल्या मजल्यावर मुलींना राहण्यासाठी भाड्याने खोल्या देण्यात आल्या होत्या. यात अनेक मुली राहत होत्या. मात्र, जेव्हा आग लागली तेव्हा वसतीगृहात जास्त मुली नव्हत्या. आगीची तीव्रता वाढल्याने मुलींना खोलीबाहेर पडणं अशक्य झालं. यातचं तीन मुलींचा होरपळून मृत्यू झाला. अद्याप आगीचे कारण समजू शकलेले नाही.