IPL Auction 2025 Live

रिक्षा चालकाकडून फेसबूकवर आयपीएस अधिकारी असल्याचे भासवून हजारो तरुणींची फसवणूक; मोबाईलमध्ये आढळली अनेक तरुणींची नग्न छायाचित्रे

तसेच सोशल मीडियाच्या माध्यामातून अनेकांची फसवणूक झाल्याचे सतत आपल्या कानावर पडत आहे. उत्तर प्रदेशातही (Uttar Pradesh) असाच धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. फेसबूकवर ( Facebook) एका पुरुषाने आयपीएस (IPS) अधिकारी असल्याचे बनावट खाते उघडून एक, दोन, तीन नव्हे तर, थेट हजारो तरुणींची फसवणूक केली आहे

सोशल मिडिया (Photo Credits: Pixabay)

सध्या सोशल मीडियाचे (Social Media) वेड अनेकांमध्ये अधिक पाहायला मिळत आहे. तसेच सोशल मीडियाच्या माध्यामातून अनेकांची फसवणूक झाल्याचे सतत आपल्या कानावर पडत आहे. उत्तर प्रदेशातही (Uttar Pradesh) असाच धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. फेसबूकवर ( Facebook) एका पुरुषाने आयपीएस (IPS) अधिकारी असल्याचे बनावट खाते उघडून एक, दोन, तीन नव्हे तर, थेट हजारो तरुणींची फसवणूक केली आहे. इज्जतनगर (Izzatnagar) येथील एका तरुणीने त्याच्या विरोधात तक्रार केल्यानंतर हा सर्व प्रकार समोर आला. आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी अधिक चौकशी केल्यानंतर त्याच्या मोबाईल मध्ये अनेक तरुणींचे नग्न अवस्थेतील छायाचित्रे आढळली आहेत. आरोपीच्या पत्नीला याबदल माहिती होती. आरोपीच्या वागणूकीला वैतागून पत्नीने अनेकदा त्याचा मोबाईल फोडला होता.

जावेद असे या आरोपीचे नाव आहे. जावेद हा बरेली येथे रहिवासी असून तो एक रिक्षा चालक आहे. जावेद याने फेसबूकवर आयपीएस नरुल हसन ( बॅच २०१५, महाराष्ट्र कॅरेड) या नावाने बनावट खाते उघडले होते. शिवाय, महाराष्ट्राचे पोलीस अधिक्षक असल्याची माहिती त्याने ठेवली होती. जावेद हा त्याच्या खात्यावरुन अनेक तरुणींशी अश्लील भाषेत गप्पा मारत असे. जावेद हा पोलीस अधिकारी असल्यामुळे त्याच्याशी लग्न करण्याची अनेक तरुणींनी इच्छा दाखवली होती. त्यापैंकी काही तरुणींनी त्याच्यावर विश्वास ठेवून अश्लील देखील छायाचित्र पाठवली आहेत. परंतु, इज्जतनगर येथील एका तरुणीने डीआयजीकडे आयपीएस अधिकारी नरुल हसन याने लग्नाचे अमिष दाखवत अश्लील गप्पा मारत असल्याचे तिने तक्रार केली आहे. त्यानंतर जावेद यानेच हे बनावट खाते उघडून अनेक तरुणींची फसवणूक केल्याचे समोर आले. या प्रकरणी पोलिसांना अधिक चौकशी केल्यानंतर जावेद याच्या मोबाईलमध्ये अनेक तरुणींचे नग्न अवस्थेतील छायाचित्रे आढळली आहे. हे देखील वाचा-मथुरा: रेल्वेमधील दारू पार्टीने त्रस्त झाले लोकसभा अध्यक्ष ओम बिरला, 5 तळीरामांना दाखवला जेलचा रस्ता

दरम्यान, जावेदच्या पत्नीला याबदल संपूर्ण माहिती होती. तिने जावेदची अनेकदा समजूत घातली. परंतु, त्याने याकडे दुर्लक्ष केले. यामुळे जावेदच्या पत्नीने त्याचा तब्बल ५ वेळा मोबाईलही फोडला होता.