Mukhtar Ansari Death: मोठे षडयंत्र रचले जात होते, त्यांना तुरुंगात स्लो पॉयझन दिले जात होते' मुख्तार अन्सारीचा मुलगा उमरचा गंभीर आरोप
मुख्तार अन्सारीचा भाऊ सिबगतुल्ला अन्सारी याने सांगितले की, सर्व काही एका कटातून घडले आहे. एक घृणास्पद घटना घडली आहे. माझा देवावर विश्वास आहे की तो बदला घेईल. अहवाल काहीही असो, मृतदेह पाहून तो आजारी होता असे म्हणता येणार नाही, तो झोपला आहे असे दिसते. तुरुंगात सुरक्षितता नाही. न्यायालयाने दखल घेऊन या घटनेची चौकशी करावी.
Mukhtar Ansari Death: मुख्तार अन्सारी (Mukhtar Ansari) यांचा मुलगा उमर अन्सारी (Umar Ansari) याने दावा केला आहे की, त्याच्या वडिलांना तुरुंगात ‘स्लो पॉयझनिंग’ (Slow Poison) देण्यात येत होते. 2005 पासून तुरुंगात असलेल्या अन्सारी यांचे गुरुवारी उत्तर प्रदेशातील बांदा येथील रुग्णालयात हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. दोन दिवसांपूर्वी मी त्यांना भेटायला आलो होतो, पण मला परवानगी नव्हती. त्याला स्लो पॉयझन दिलं जात असल्याचं आम्ही आधीही सांगितलं होतं. 19 मार्चला तुरुंगात त्याच्या जेवणात विषारी द्रव्य टाकलं होतं. आमचा त्यावर पूर्ण विश्वास असल्याने आम्ही कोर्टात जाऊ, असंही उमर अन्सारीने म्हटलं आहे.
मला काय वाटते ते सांगून उपयोग काय? वडिलांना वॉर्डात ॲडमिट करण्याऐवजी 15 दिवसांपूर्वी आयसीयूमध्ये ठेवण्यात आले होते. त्याला आयसीयूमधून थेट तुरुंगात नेले. मला पप्पांनी सांगितले होते की, त्यांना स्लो पॉइझन दिले जात आहे, असंही उमर यांनी माध्यमांशी बोलताना नमूद केलं आहे. (हेही वाचा -Mukhtar Ansari Death: मुख्तार अन्सारी यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन; बांदा मेडिकल कॉलेजमध्ये घेतला अखेरचा श्वास- Reports)
मुख्तार अन्सारीचा भाऊ सिबगतुल्ला अन्सारी याने सांगितले की, सर्व काही एका कटातून घडले आहे. एक घृणास्पद घटना घडली आहे. माझा देवावर विश्वास आहे की तो बदला घेईल. अहवाल काहीही असो, मृतदेह पाहून तो आजारी होता असे म्हणता येणार नाही, तो झोपला आहे असे दिसते. तुरुंगात सुरक्षितता नाही. न्यायालयाने दखल घेऊन या घटनेची चौकशी करावी, असं सिबगतुल्ला अन्सारी यांनी म्हटलं आहे. (वाचा - (हेही वाचा: Delhi Hospitals Children Deaths: दिल्लीच्या 'या' रुग्णालयांमध्ये दर दोन दिवसांमध्ये पाच मुलांचा मृत्यू; RTI मधून मोठा खुलासा)
यूपीच्या बांदा तुरुंगात बंद असलेला गँगस्टर मुख्तार अन्सारी याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. गुरुवारी सायंकाळी 8.30 च्या सुमारास कारागृहात मुख्तारची प्रकृती खालावली. मुख्तार यांनी उलट्या होत असल्याची तक्रार केली. याची माहिती मिळताच जिल्हा दंडाधिकारी दुर्गा शक्ती नागपाल, एसपी अंकुर अग्रवाल अनेक पोलिस ठाण्यांतील पोलिस दलासह तुरुंगात पोहोचले. सुमारे 40 मिनिटे अधिकारी कारागृहातच होते.
यानंतर मुख्तार यांना रुग्णवाहिकेतून बेशुद्ध अवस्थेत राणी दुर्गावती वैद्यकीय महाविद्यालयाच्या आपत्कालीन वॉर्डात आणण्यात आले. त्यांच्यावर वैद्यकीय महाविद्यालयातील 9 डॉक्टरांच्या पथकाने तातडीने उपचार सुरू केले. मात्र, याचदरम्यान मुख्तार यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. यानंतर रात्री 10.30 च्या सुमारास प्रशासनाने मुख्तारच्या मृत्यूची माहिती सार्वजनिक केली.
मुख्तार अन्सारीच्या मृत्यूनंतर संपूर्ण राज्यात अलर्ट जारी करण्यात आला आहे. मऊ आणि गाझीपूरमध्ये पोलीस फ्लॅग मार्च काढत आहेत. मऊ, बांदा आणि गाझीपूरमध्ये कलम 144 लागू करण्यात आले आहे. मेडिकल कॉलेज आणि बांदा कारागृहाबाहेर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. मुख्तार अन्सारीच्या मृतदेहाचे तीन डॉक्टर्स पोस्टमार्टम करणार आहेत. त्यानंतर त्यांचा मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात दिला जाईल.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)