Kolkata: हृदयद्रावक! लोखंडी तारेवर कपडे सुकवताना बसला विजेचा धक्का; वाचवताना पत्नी आणि सासूलाही गमवावा लागला जीव
त्याला मदत करण्याच्या प्रयत्नात त्याची पत्नी आणि सासू घटनास्थळी दाखल झाल्या. पण त्यांना विजेचा धक्काही बसला.
Kolkata: कोलकात्याच्या एकबालपूर भागात (Ekbalpore Area) विजेच्या धक्क्याने (Electric Shock) एकाच कुटुंबातील तीन जणांना आपला जीव गमवावा लागल्याची दुःखद घटना घडली. एका व्यक्तीने कपडे सुकवण्यासाठी इलेक्ट्रिक केबलचा (Iron Wire) वापर केला असताना हा अपघात झाला. सुरुवातीला या व्यक्तीला विजेचा धक्का बसला. त्याला मदत करण्याच्या प्रयत्नात त्याची पत्नी आणि सासू घटनास्थळी दाखल झाल्या. पण त्यांना विजेचा धक्काही बसला.
या घटनेनंतर तिघांना तातडीने वैद्यकीय मदतीसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, तेथे पोहोचल्यावर डॉक्टरांनी आई आणि मुलीला मृत घोषित केले. आई आणि मुलीचा घटनास्थळी मृत्यू झाला. तसेच या घटनेत जावई गंभीर जखमी झाला होता. मात्र, रुग्णालयात उपचार घेत असताना त्याचा मृत्यू झाला. (हेही वाचा - West Bengal: माणुसकीला काळीमा! रुग्णवाहिकेचे भाडे द्यायला नव्हते पैसे; वडिलांनी मुलाचा मृतदेह बॅगमध्ये घेऊन केला 200 किलोमीटर प्रवास)
ओले कपडे सुकवत असताना मयत आईचा जावई इजहार अख्तर हा भिंतीला जोडलेल्या धातूच्या तारेवरून विजेचा धक्का लागल्याने गंभीर जखमी झाला. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. एकबालपूर नर्सिंग होममध्ये त्यांच्यावर वैद्यकीय उपचार सुरू होते.
त्या व्यक्तीला वाचवण्याच्या प्रयत्नात आई आणि मुलीलाही विद्युत प्रवाहाचा धक्का बसला. त्यांना ताबडतोब कोलकाता येथील एसएसकेएम मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. परंतु, तेथे पोहोचल्यावर त्यांना मृत घोषित करण्यात आले.
इझार अख्तरेक्टोवुती, मुन्ताहा बेगम आणि खैरुल नेसा अशी या घटनेत मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. रविवारी पहाटे कोलकात्याच्या एकबालपूर भागात ही दुर्दैवी घटना घडली. घटनेनंतर, कलकत्ता इलेक्ट्रिक सप्लाय कॉर्पोरेशन (CESC) लिमिटेडचे प्रतिनिधी अपघाताच्या ठिकाणी केबलची तपासणी करण्यासाठी पोहोचले.