Lockdown In India: लॉकडाऊन वाढविण्याची कोणतीही योजना नाही - कॅबिनेट सचिव राजीव गौबा

कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सध्या संपूर्ण देशात 14 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन करण्यात आले आहे. दरम्यान, नागरिकांमध्ये लॉकडाऊन संदर्भात अफवा पसरवल्या जात आहेत. परंतु, लॉकडाऊन वाढविण्याची कोणतीही योजना नसल्याचं गौबा यांनी स्पष्ट केलं आहे.

Cabinet Secretary Rajiv Gauba (PC - ANI)

Lockdown In India: लॉकडाऊन वाढविण्याची कोणतीही योजना नाही, असं कॅबिनेट सचिव राजीव गौबा (Cabinet Secretary Rajiv Gauba) यांनी सांगितलं आहे. कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सध्या संपूर्ण देशात 14 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन (Lockdown) करण्यात आले आहे. दरम्यान, नागरिकांमध्ये लॉकडाऊन संदर्भात अफवा पसरवल्या जात आहेत. परंतु, लॉकडाऊन वाढविण्याची कोणतीही योजना नसल्याचं गौबा यांनी स्पष्ट केलं आहे.

कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात 21 दिवसांच लॉकडाऊन घोषित केलं होतं. मात्र, सध्या देशात कोरोना बाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे नागरिकांनामध्ये लॉकडाऊन आणखी काही दिवस राहणार असल्याची अफवा पसवण्यात येत आहे. मात्र, आता यासंदर्भात राजीव गौबा यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. (हेही वाचा - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी योगा व्हिडिओ शेअर करत सांगितलं आपल्या फिटनेसचं रहस्य; पहा व्हिडिओ)

देशात कोरोना बाधित रुग्णांची संख्या 1024 वर पोहचली आहे. यातील 96 जणांनी कोरोनावर मात केली असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. मात्र, या जीवघेण्या विषाणुमुळे आतापर्यंत देशात 27 जणांचा बळी गेला आहे. आरोग्यमंत्रालयाकडून यांसदर्भात आकडेवारी जाहीर करण्यात आली आहे. कोरोनामुळे भारताबरोबचं अमेरिका, स्पेन, इटली आदी देशांमध्ये अनेकांचा बळी गेला आहे.