MP Boy Dies as Metal Piece Pierces his Stomach: स्टीलचा तुकडा पोटात घुसल्याने 5 वर्षाच्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू, नेमका कसा घडला घात?

सगळीकडेच फटाके बाजी आणि घोषणा बाजी सुरु होती.

Boy Died as Metal Piece Pierces his Stomach PC TW

MP Boy as Metal Piece Pierces his Stomach: मध्य प्रदेशातालील भोपाळ येथे टी 20 विश्वचषक (T 20 world Cup) स्पर्धेत भारताचा विजय झाल्याचा आनंद साजरा करताना एक दुर्घटना घडली आहे. सगळीकडेच फटाके बाजी आणि घोषणा बाजी सुरु होती. त्यावेळी भोपाळ जिल्ह्यातील गोहलपूर भागात फटाको फोडले जात असताना स्टीलचा तुकडा एका 5 वर्षाच्या मुलाच्या पोटात घुसला. या घटनेनंतर मुलाचा मृत्यू झाला, ही घटना इतकी ह्रदयद्रावक होती की, परिसरात भारताचा विजय साजरा करण्याऐवजी दुख व्यक्त केलं जात होते. (हेही वाचा- लोंखडी रॉड डोक्यात घालून ग्राहकाची केली हत्या, दुकानमालकासह मुलांना अटक)

मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी टी 20 विश्वचषक स्पर्धेत भारताने यश मिळवण्याचा आनंद साजरा करण्यासाठी गोहलपूर भागात अनेक जण फटाके फोडत होते. तर एका गटाने फटाके फोडताना स्टीलच्या वस्तूचा वापर केला होता. फटाके स्टीलच्या डब्ब्या खाली गेला आणि फटाक्यांच्या स्फोटामुळे  स्टीलचे तुकडे उडाले. एक स्टीलचा तुकडा रस्त्यावर उभ्या असलेल्या मुलाच्या पोटात घुसला. स्टीलचा तुकडा पोटात घुसल्याने त्याला गंभीर जखमी होऊन रक्तस्त्राव होऊ लागला.

पाहा व्हिडिओ

कुटुंबियांनी त्याला रुग्णालयात दाखल केले परंतु डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. दीपक ठाकुर असं मृत मुलाचे नाव होते. या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी या घटनेअतंर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. दीपकच्या मृत्यूनंतर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. पोलिस या संदर्भात सीसीटीव्ही फुटेज शोधत आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif