Himachal Pradesh: विद्यार्थींनीला फरफटलं, चोरट्यांचा लुटण्याचा प्रयत्न फसला, तिघे जण अटकेत
हिमाचल प्रदेशातील मंडी जिल्ह्यात एका कॉलेजच्या विद्यार्थींनीला भरदिवसा लुटण्याचा प्रयत्न फसला. रस्त्यावर उभी असताना अचानक एका कारमध्ये असलेल्या तरुणांनी विद्यार्थींनीला लुटण्याचा प्रयत्न केला.
Himachal Pradesh: हिमाचल प्रदेशातील मंडी जिल्ह्यात एका कॉलेजच्या विद्यार्थींनीला भरदिवसा लुटण्याचा प्रयत्न फसला. रस्त्यावर उभी असताना अचानक एका कारमध्ये असलेल्या तरुणांनी विद्यार्थींनीला लुटण्याचा प्रयत्न केला. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली. घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर तीन आरोपींना अटक करण्यात आले आहे. (हेही वाचा- महिलेचे जिंदाल स्टीलच्या CEO वर लैंगिक अत्याचाराचे आरोप; चेअरमन Naveen Jindal म्हणाले- 'आवश्यक कारवाई केली जाईल')
मिळालेल्या अधिक माहितीनुसार, शुक्रवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास विद्यार्थ्यींनी बसची वाट पाहत बस स्थानकाजवळ उभी होती त्यावेळी एका कारमधील तिघांन्ही तिच्या लक्ष वेधून घेतले. तीला टारगेट करत तीची सोनसाखळी आणि पर्स खेचून घेऊन जाणाचा प्रयत्न करत होते. काही अंतरापर्यंत तीला फरफटत नेले. यशस्वीपणे आरोपी घटनास्थळावरून फरार झाले परंतु विद्यार्थ्यींनीला कारने फरफटत नेल्यामुळे खाली पडली आणि जखमी झाली. ही घटना सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत आहे. ही घटना मंडी पठाणकोट राष्ट्रीय महामार्ग आयहूनजवळ घडली आहे.
पाहा व्हिडिओ
तिघे आरोपी पंजाब येथील असल्याचे समोर आले आहे. कार पंजाब राज्याची असल्याचे व्हिडिओत दिसले. सुदैवाने विद्यार्थ्यींनीला लुटण्याचा प्रयत्न फसला. या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली विशेष म्हणजे पोलिसांनी पकडू नये म्हणून त्यांनी कारची नंबर प्लेट बदलून टाकली परंतु पोलिसांनी नाकाबंदी दरम्यान आरोपींना पकडले. या प्रकरणी पोलिसांची चौकशी सुरु आहे.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)