Rozgar Mela 2023: फोन बँकिंग घोटाळा मागील सरकारच्या सर्वात मोठ्या घोटाळ्यांपैकी एक; पंतप्रधान मोदींचा गांधी कुटुंबावर निशाणा
त्यांनी सांगितले की 2014 मध्ये आम्ही बँकिंग क्षेत्राला पुनरुज्जीवित करण्यास सुरुवात केली. आम्ही देशातील सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचे व्यवस्थापन मजबूत केले. छोट्या बँका एका मोठ्या बँकेत विलीन झाल्या. सरकारने दिवाळखोरी संहिता लागू केली, जेणेकरून भविष्यात कोणतीही बँक बंद पडल्यास त्यांना कमी नुकसान सहन करावे लागेल.
Rozgar Mela 2023: पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Modi) यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे रोजगार मेळा (Rozgar Mela 2023) अंतर्गत सरकारी विभाग आणि संस्थांमध्ये नव्याने भरती झालेल्या 70,000 हून अधिक नियुक्ती पत्रांचे वाटप केले. या कार्यक्रमादरम्यान पंतप्रधानांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली आणि पक्षावर फोन बँकिंग घोटाळ्याचा आरोपही केला. जनतेला संबोधित करताना ते म्हणाले की, स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवात देश विकासाकडे वाटचाल करत असताना सरकारी कर्मचारी म्हणून योगदान देणे ही अभिमानाची बाब आहे. भारतातील जनतेने देशाला विकसित करण्याची शपथ घेतली आहे. आगामी 25 वर्षे भारतासाठी महत्त्वाची आहेत.
यावेळी, पीएम मोदी म्हणाले की, फोन बँकिंग घोटाळ्याने बँकिंग क्षेत्राचा कणा मोडला आहे. त्यांनी सांगितले की 2014 मध्ये आम्ही बँकिंग क्षेत्राला पुनरुज्जीवित करण्यास सुरुवात केली. आम्ही देशातील सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचे व्यवस्थापन मजबूत केले. छोट्या बँका एका मोठ्या बँकेत विलीन झाल्या. सरकारने दिवाळखोरी संहिता लागू केली, जेणेकरून भविष्यात कोणतीही बँक बंद पडल्यास त्यांना कमी नुकसान सहन करावे लागेल. (हेही वाचा - पाकिस्तानमधून आलेल्या Seema Haider ची भारतीय नागरिकत्व मिळण्याची विनंती; देशाची सून असल्याचा दावा करत राष्ट्रपती Droupadi Murmu यांना पाठवले पत्र)
व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे रोजगार मेळाव्याला संबोधित करताना पीएम मोदी म्हणाले की, सध्या भारताचे बँकिंग क्षेत्र जगातील सर्वात मजबूत मानले जाते. नऊ वर्षांपूर्वीपर्यंत ही परिस्थिती नव्हती. काँग्रेसवर निशाणा साधत ते म्हणाले की, यापूर्वीच्या सरकारमध्ये बँकिंग क्षेत्रात प्रचंड विध्वंस झाला. ते म्हणाले की, आज आपण डिजिटल व्यवहार करू शकतो, पण नऊ वर्षांपूर्वीपर्यंत 140 कोटी लोकसंख्येमध्ये मोबाइल बँकिंग नव्हते.
काँग्रेसवर आरोप करताना पीएम मोदी म्हणाले की, पूर्वीच्या सरकारच्या जवळच्या लोकांना एका फोनवर बँकांकडून हजारो कोटींची कर्जे देण्यात आली, ज्यांची परतफेड आजपर्यंत झालेली नाही. हा फोन बँकिंग घोटाळा मागील सरकारमधील आतापर्यंतचा सर्वात मोठा घोटाळा होता.
पंतप्रधान मोदींचे कौतुक करताना केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू म्हणाले की, रोजगार मेळावा हा पंतप्रधान मोदींच्या 10 लाख सरकारी नोकऱ्या निर्माण करण्याच्या आणि योग्य लोकांना संबंधित पदांवर नियुक्त करण्याच्या वचनाचा एक भाग आहे. आम्ही याला केवळ नोकरी नाही तर देशसेवा मानतो.