Mallikarjun Kharge On NDA Government: 'एनडीए सरकार चुकून स्थापन झाले असून ते कधीही पडू शकते'; मल्लिकार्जुन खरगे यांचा दावा
विरोधकांकडून आघाडी सरकारवर सातत्याने निशाणा साधला जात आहे. सरकार आपला कार्यकाळ पूर्ण करू शकणार नाही, असा दावा विरोधक करत आहेत. दरम्यान, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केंद्रातील मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.
Mallikarjun Kharge On NDA Government: केंद्रात तिसऱ्यांदा मोदी सरकार (Modi Government) स्थापन झाले आहे. मात्र, यावेळी भाजपला बहुमत मिळू शकले नाही, त्यामुळे नरेंद्र मोदींनी (PM Narendra Modi) एनडीए आघाडी (NDA Alliance) च्या पक्षांच्या मदतीने पंतप्रधानपदाची शपथ घेतली. विरोधकांकडून आघाडी सरकारवर सातत्याने निशाणा साधला जात आहे. सरकार आपला कार्यकाळ पूर्ण करू शकणार नाही, असा दावा विरोधक करत आहेत. दरम्यान, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे (Mallikarjun Kharge) यांनी केंद्रातील मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.
बेंगळुरूमध्ये एका वृत्तसंस्थेशी बोलताना मल्लिकार्जुन खरगे म्हणाले की, 'एनडीए सरकार चुकून स्थापन झाले असून मोदीजींना जनादेश (बहुमत) नाही, त्यामुळे हे सरकार कधीही पडू शकते. देशाच्या उभारणीसाठी आपण सर्वांनी मिळून काम केले पाहिजे. पण आपल्या पंतप्रधानांची सवय अशी आहे की, जे चांगले चालले आहे ते चालूच ठेवू देत नाहीत. पण आपण आपल्या बाजूने देशाला मजबूत करण्यासाठी सहकार्य करू.' (हेही वाचा - PM Modi Oath Ceremony: नरेंद्र मोदींच्या शपथविधीला मल्लिकार्जुन खरगे उपस्थित राहणार)
दरम्यान, 2024 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने 543 पैकी 240 जागांवर विजय मिळवला. एनडीए आघाडीने अपेक्षेपेक्षा कमी कामगिरी केली आणि केवळ 292 जागा जिंकल्या. त्याच वेळी, काँग्रेससह विरोधी पक्षांच्या भारत आघाडीने चांगली कामगिरी करत 234 जागा जिंकल्या आहेत. तथापी, भाजपने मित्र पक्षांसोबत आघाडी करत सरकार स्थापन केलं आहे. मात्र, विरोधक मोदी सरकार 3.0 वर सतत निशाणा साधत आहेत. (हेही वाचा -Independent MP Vishal Patil Supports Congress: सांगलीचे अपक्ष खासदार विशाल पाटील यांचा काँग्रेसला पाठिंबा; Mallikarjun Kharge यांनी केले स्वागत)
काँग्रेस अध्यक्ष खर्गे यांनी कथित NEET पेपर लीक प्रकरणावरूनही केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. जर मोदी सरकारच्या म्हणण्यानुसार NEET मध्ये एकही पेपर लीक झाला नाही तर मग ही अटक का करण्यात आली? यातून काय निष्कर्ष निघाला? मोदी सरकार आधी देशातील जनतेच्या डोळ्यात धूळफेक करत होते की आता? मोदी सरकारने 24 लाख तरुणांच्या आशा-आकांक्षांचा गळा घोटण्याचे काम केले आहे. NEET मध्ये 24 लाख तरुण डॉक्टर होण्यासाठी परीक्षेला बसतात, ज्यामध्ये ते 1 लाख वैद्यकीय जागांसाठी रात्रंदिवस मेहनत करतात. या 1 लाख जागांपैकी सुमारे 55,000 जागा सरकारी महाविद्यालयांमध्ये आहेत जिथे SC, ST, OBC, EWS प्रवर्गासाठी जागा राखीव आहेत, असंही खरगे यांनी म्हटलं आहे.
मोदी सरकारने एनटीएचा गैरवापर केला आहे आणि मार्क आणि रँकमध्ये मोठ्या प्रमाणात हेराफेरी केली आहे. ज्यामुळे राखीव जागांसाठी कट ऑफ देखील वाढला आहे. गुणवान विद्यार्थ्यांना सवलतीच्या दरात शासकीय प्रवेशापासून वंचित ठेवण्यासाठी ग्रेस मार्क्स, पेपरफुटी आणि हेराफेरीचा खेळ खेळण्यात आल्याचे दिसून येत आहे, असंही खरगे यांनी यावेळी नमूद केलं.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)