COVID-19 Vaccine Update in India: मोदी सरकार लवकरच कोरोना लस वापरण्यासाठी हिरवा कंदील दाखवण्याची शक्तता, 50 दशलक्ष डोस तयार - अदार पूनावाला

आपल्याकडे कोविशिल्ड लसीचे 40-50 दशलक्ष डोस तयार आहेत, असंही अदार पूनावाला यांनी सांगितलं आहे.

अदार पूनावाला (Photo Credits: Twitter)

COVID-19 Vaccine Update in India: भारतात कोरोना व्हायरस (Coronavirus Pandemic) चा उद्रेक भारतात कमी झालेला नाही. कोविड-19 लस बाजारात येईपर्यंत या विषाणूपासून मुक्तता मिळणार नाही. दरम्यान, सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (Serum Institute of India)कडून एक मोठे विधान समोर आले आहे. त्यानुसार, मोदी सरकार लवकरचं कोरोना लसीच्या आपत्कालीन वापरास मान्यता देऊ शकते, अशी आशा कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदार पूनावाला (Adar Poonawalla) यांनी व्यक्त केली आहे.

अदार पूनावालाला यांनी यासंदर्भात बोलताना म्हटलं आहे की, केंद्र सरकार लवकरच कोरोना लसीच्या आपत्कालीन वापरास परवानगी देऊ शकते. आपल्याकडे कोविशिल्ड लसीचे 40-50 दशलक्ष डोस तयार आहेत. परवानगी मिळाल्यानंतर सरकारने ठरवायचे आहे, की त्यांना किती डोस हवे आहेत. (हेही वाचा - MHA Extends Guidelines for COVID19: कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर गृह मंत्रालयाकडून पूर्वीच्या मार्गदर्शक सूचना 31 जानेवारी 2021 पर्यंत लागू)

दरम्यान, 2021 पर्यंत 30 कोटी डोस लस तयार करण्याचे आमचे लक्ष्य आहे. ऑक्सफोर्ड विद्यापीठ आणि अ‍ॅस्ट्रॅजेनेका एकत्र कोरोना लस तयार करत आहेत. ऑक्सफोर्डने भारतातील लसीसाठी सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाशी करार केला आहे.