Weather Update: 'या' राज्यात रिमझिम पावसाची शक्यता, हवामाना खात्याने दिला अंदाज
हिवाळ्यात देशात ठिकठिकाणी रिमझिम पाऊस पडत आहे.
Weather Update: आज महाराष्ट्रात पावसाची शक्यता दर्शवली आहे. हिवाळ्यात देशात ठिकठिकाणी रिमझिम पाऊस पडत आहे. ऐन दिवाळीच्या सणाला पावसाने हजेरी लावली आहे. महाराष्ट्रात रत्नागिरी, कोल्हापूर, सातारा आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये पावसाचा अंदाज वर्तवला आहे. हवामान विभागाने ट्वीट करत ही माहिती दिली आहे. दिवाळीत कडकडीत थंडी ऐवजी नागरिकांना पावसाने वातावरणात बदल होताना दिसत आहे. काही ठिकाणी ढगाळ वातावरण पाहायला मिळत आहे. आठवड्याभरापासून पाऊस पडत आहे.
पुढील राज्यात अवकाळी पाऊस
महाराष्ट्रासह, गोवा, केरळ, तामिळनाडू आणि दिल्लीत पावसाने हजेरी लावली आहे. अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने मान्सून अनुकुल परिस्थिती निर्माण झाल्याने झाल्याने पाऊस पडत आहे. मुंबई, पुणे जिल्ह्यात दोन दिवसांपासून पावसाने हैराण केले आहे. ठाणे जिल्ह्यात शनिवारी रिमझिम पाऊस पडला. पावसामुळे मुंबईतील वातावरणात बदल झाल्याचे हवामान खात्याने सांगितले आहे. हवामानात बदल झाल्यामुळे राज्यातील अनेक ठिकाणी तापमानात चढ- उतार होताना दिसत आहे.
आज कोकण-गोवा आणि मराठवाड्यात पाऊस पडण्याची शक्यता आहे. रत्नागिरी, कोल्हापूर, सातारा आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्येही पावसाचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पुढील दिवसात वातावरण थंडी पसरले. आयएमडी ने आज रविवारी उत्तराखंडमध्ये पाऊस आणि बर्फवृष्टीचा अंदाज वर्तवला आहे. याशिवाय जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश आणि इतर भागात पाऊस आणि बर्फवृष्टीची शक्यता वर्तवण्यात आली आहे