Arunachal Avalanche: अरुणाचल प्रदेशात लष्कराच्या 7 जवानांचे मृतदेह सापडले, हिमवादळानंतर करण्यात आले होते शोधकार्य

त्यामुळे हवामान खराब झाले होते.

Representation image (PC - Wikimedia Commons)

Arunachal Pradesh Army Soldiers: अरुणाचल प्रदेशात हिमस्खलनानंतर (Arunachal Avalanche) बेपत्ता झालेल्या लष्कराच्या 7 जवानांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. सोमवारी 7 फेब्रुवारीला सांगण्यात आले की, अरुणाचलमध्ये लष्कराचे गस्त घालणारे पथक हिमस्खलनाच्या तडाख्यात आले आहे. तेव्हापासून लष्कराचे बचावकार्य सातत्याने सुरू होते. मात्र, लष्कराच्या या 7 जवानांपैकी एकालाही जिवंत बाहेर काढता आले नाही. ते सापडले तोपर्यंत खूप उशीर झाला होता. सध्या सर्वांचे पार्थिव त्यांच्या घरी नेण्याची तयारी सुरू आहे.

लष्कराने माहिती देताना सांगितले होते की, अरुणाचल प्रदेशातील कामेंग सेक्टरमध्ये 7 जवानांची गस्त घालणारी दल हिमस्खलनाच्या तडाख्यात आली आहे. ज्यामध्ये सर्व सैनिक बेपत्ता असल्याचे सांगण्यात आले. लष्कराने सांगितले की, या सर्व जवानांच्या बचावासाठी एक विशेष पथक घटनास्थळी रवाना करण्यात आले होते. (वाचा - Naxals IED blast in Chhattisgarh: नक्षलवाद्यांनी घडवून आणलेल्या IED स्फोटात चार CRPF जवान जखमी)

ज्या भागात ही हिमस्खलनाची घटना घडली त्या भागात गेल्या अनेक दिवसांपासून सातत्याने बर्फवृष्टी होत होती. त्यामुळे हवामान खराब झाले होते. कारण हा भाग चीनच्या सीमेला लागून आहे, अशा परिस्थितीत लष्कराचे जवान येथे सतत गस्त घालत असतात. या गस्तीदरम्यान हा अपघात झाला.